शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘गरिबी हटाओ’ची मोदींकडून खिल्ली

By admin | Updated: June 3, 2016 03:00 IST

‘गरिबी हटाओ’चा नारा ज्यांनी दिला होता, त्यांचा हेतू चांगला असेलही, परंतु त्यांनी हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी निवडलेला मार्ग मात्र अयोग्य होता, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी

बालासोर (ओडिशा) : ‘गरिबी हटाओ’चा नारा ज्यांनी दिला होता, त्यांचा हेतू चांगला असेलही, परंतु त्यांनी हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी निवडलेला मार्ग मात्र अयोग्य होता, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या या घोषणेची खिल्ली उडविली.ओडिशाच्या बालासोर येथे एका रॅलीला संबोधित करताना मोदी बोलत होते. त्यांनी ‘संतुलित’ विकासाचे आवाहन केले आणि नैसर्गिक संसाधनांनी युक्त असलेला पूर्व भाग मागासलेला असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. ओडिशा, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि आसामच्या विकासाची गरज असल्याचे सांगून मोदी म्हणाले, ‘माझे सरकार गरिबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. गरीब हाच आमच्या सर्व योजनांच्या केंद्रस्थानी असेल. त्यासाठीची योजना आमच्या सरकारने तयार केली असून, या योजनेचा प्रत्यक्ष परिणाम तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल.’मोदींनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचे प्रत्यक्ष नाव न घेता, टीका केली. ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही, तेथील अवस्था काय आहे, हे तुम्हीच अधिक जाणता, असे सांगून ते म्हणाले की, या राज्यातही आता बदल होणे गरजेचे बनले आहे. निवडणुका, आंदोलने, नसतानाही बालासोरसारख्या सिटीमध्ये माझे भाषण ऐकायला तुम्ही आला आहात. याचा अर्थच मुळी तुमचा सरकारवर विश्वास आहे. माझे सरकार देशातील गरिबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे, असे मी याआधीही सांगितले होते. जेव्हा मी हे सांगितले तेव्हा माझा उद्देश कोणतेही राज्य वा क्षेत्र विकासाच्या बाबतीत मागासलेले राहू नये हा होता. संतुलित विकास झाला पाहिजे आणि त्याचा प्रत्येकालाच फायदा झाला पाहिजे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, आमचे सरकार प्रामाणिकपणे काम करीत आहे, हे लक्षात घेतले तरच तुम्हाला आम्ही घेतलेल्या निर्णयांच्या फायद्याकडे पाहता येईल. गरिबी दूर करण्यासाठीही जनतेने केंद्र सरकारला सहकार्य करणे आवश्यक आहे. संतुलित विकासाचे आवाहन ओडिशाच्या बालासोर येथे एका रॅलीला संबोधित करताना मोदी बोलत होते. त्यांनी ‘संतुलित’ विकासाचे आवाहन केले आणि नैसर्गिक संसाधनांनी युक्त असलेला पूर्व भाग मागासलेला असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.आम्ही गेल्या ६० वर्षांपासून गरिबी हटाओ हा नारा ऐकत आलो आहोत. हा नारा देणाऱ्यांच्या हेतूवर मला शंका घ्यायची नाही. पण त्यांनी यासाठी निवडलेला मार्ग चुकीचा होता. कारण गरिबी, बेरोजगारी आणि रोगराई वाढतच गेली आहे. सरकार श्रीमंतांसाठी नसते. गरिबांसाठी असते. समस्येचे शास्त्रीय कारण शोधत नाही तोपर्यंत गरिबी हटणार नाही.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान