शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत फ्लॅटमध्ये मुंबईच्या महिलेवर सामूहिक बलात्कार

By admin | Updated: April 17, 2016 20:53 IST

मुंबईतील एका २६ वर्षीय महिलेवर दिल्लीतील फ्लॅटमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य दिल्लीतील जुन्या राजेंद्रनगरमधील एका फ्लॅटमध्ये ही घटना घडली.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १७ - मुंबईतील एका २६ वर्षीय महिलेवर दिल्लीतील फ्लॅटमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य दिल्लीतील जुन्या राजेंद्रनगरमधील एका फ्लॅटमध्ये ही घटना घडली. महिलेला जबदरस्तीने दारु पाजून दोघा नराधमांनी तिच्यावर शुक्रवारी रात्री सामूहिक बलात्कार  केला. 
 
हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणी पोलिसांनी एका कॉंट्रेक्टरला अटक केली असून, दुसरा आरोपी फरार आहे. दुसरा फरार आरोपी महापालिकेत अभियंता आहे असे सूत्रांनी सांगितले. कॉंट्रेक्टर आणि पिडीत महिलेची ओळख होती. अत्याचारामध्ये महिला जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
 
आरोपींनी पिडीत महिलेला अनैसर्गिक शरीरसंबंधांसाठी भाग पाडले. पिडीतमहिला दिल्लीच्या सफदरजंग येथे दुस-या महिलेसोबत भाडयाच्या घरात रहात होती. सात महिन्यांपूर्वी ती दिल्लीत आली होती. महिलेने केलेल्या तक्रारीनुसार मुंबईमध्ये असताना तिची फेसबुकवरुन कॉंन्ट्रेक्टर मनीष बरोबर ओळख झाली. 
 
मनीषने मैत्री वाढवून फेसबुकवरुन पिडीत महिलेबरोबर चॅटिंग सुरु केले. दोघांनी एकमेकांना आपआपले मोबाईल नंबरही दिले. काही आठवडयांनी मनीषने महिलेला विवाहाची मागणी घातली आणि दिल्लीला येण्यास सांगितले. मनीषने संबंधित महिलेला तिच्या सर्व खर्चाचा भार उचलण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पिडीत महिला रहाण्यासाठी दिल्लीला आली असे पोलिसांनी सांगितले. 
 
गुरुवारी मनीषने विवाहाबद्दल चर्चा करण्यासाठी महिलेला जुन्या राजेंद्र नगरमधील फ्लॅटवर बोलवले. महिला फ्लॅटवर गेल्यानंतर मनीषचा मित्र तिथे आला व त्याने जबरदस्ती सुरु केली. महिलेने त्याला विरोध केला. त्यानंतर मनीषने पिडीतेला अपशब्द सुनावले व दोघांनी तिला दारु पिण्यास भाग पाडले. त्यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. 
 
पिडीत महिलेने कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली आणि पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. रस्त्यावर पोलिसांना  ही महिला सापडली तेव्हा ती मद्याच्या नशेत होती असे अधिका-याने सांगितले. वैद्यकीय तपासणीनंतर महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. राजेंद्र नगर पोलिस स्थानकात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.