शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जवान हनुमंतअप्पांवर अंत्यसंस्कार

By admin | Updated: February 13, 2016 02:22 IST

सियाचीनमध्ये ३० फूट बर्फाखाली गाडले गेल्यानंतरही तब्बल नऊ दिवसपर्यंत मृत्यूशी झुंज देणारे भारतीय लष्कराचे जिगरबाज जवान लान्स नायक हनुमंतअप्पा कोप्पड यांना शुक्रवारी

धारवाड : सियाचीनमध्ये ३० फूट बर्फाखाली गाडले गेल्यानंतरही तब्बल नऊ दिवसपर्यंत मृत्यूशी झुंज देणारे भारतीय लष्कराचे जिगरबाज जवान लान्स नायक हनुमंतअप्पा कोप्पड यांना शुक्रवारी हजारो साश्रूनयनांच्या साक्षीने अखेरचा निरोप देण्यात आला. कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्णातील बेटादूर या गावी हनुमंतअप्पा यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत्यसंस्काराच्या वेळी हनुमंतअप्पा यांची पत्नी, आई आणि दोन वर्षांची कन्या उपस्थित होती. हनुमंतअप्पा यांच्या निधनामुळे बेटादूर गावावर शोककळा पसरली आहे. तत्पूर्वी गुरुवारी रात्री हनुमंतअप्पा यांचे पार्थिव हुबळीच्या किम्स रुग्णालयात ठेवण्यात आले होते. तेथून ते नेहरू मैदानावर हलविण्यात आले, जेथे हजारो लोकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, केंद्रीय मंत्री अनंतकुमार, राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर आणि अन्य नेत्यांनीही हनुमंतअप्पा यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर हनुमंतअप्पा यांचे पार्थिव बेटादूर येथे आणण्यात आले. ३३ वर्षीय हनुमंतअप्पा हे सियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनानंतर अन्य नऊ जवानांसह ३० फूट बर्फात गाडले गेले होते. तेथे त्यांनी सहा दिवसपर्यंत मृत्यूशी झुंज दिली. बचाव पथकाने त्यांना बाहेर काढले त्यावेळी ते जिवंत होते. त्यांना लगेच दिल्लीच्या रुग्णालयात हलविण्यात आले, जेथे त्यांना तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर वीरमरण आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी हनुमंतप्पांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान, कुटुंबीयांना भूखंड, पत्नीला सरकारी नोकरी व स्मारक बांधण्याची घोषणा केली होती. (वृत्तसंस्था)हनुमंतअप्पा कोप्पड यांच्यावर बेटादूर या त्यांच्या जन्मगावातील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ ‘हनुमंतप्पा अमर रहे,’ ‘भारत माता की जय,’च्या निनादात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बेटादूर आणि आसपासच्या गावातील हजारो लोकांनी हनुमंतअप्पा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लोकांची रीघ लागली होती.