शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांवरील गुन्‘ांप्रश्नी सेना आक्रमक प्रचंड घोषणाबाजी: गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा

By admin | Updated: January 14, 2016 23:59 IST

जळगाव : विम्या संदर्भात जिल्हा बॅँकेत चौकशीसाठी गेलेल्या शेतकर्‍यांवर दाखल गुन्‘ाप्रश्नी शिवसेनेने आक्रमक धोरण स्वीकारत आज जेलभरोचा इशारा देत, प्रचंड घोषणाबाजी करत मोर्चा काढला. आमदार गुलाबराव पाटील स्वत: या मोर्चात सहभागी झाले होते.

जळगाव : विम्या संदर्भात जिल्हा बॅँकेत चौकशीसाठी गेलेल्या शेतकर्‍यांवर दाखल गुन्‘ाप्रश्नी शिवसेनेने आक्रमक धोरण स्वीकारत आज जेलभरोचा इशारा देत, प्रचंड घोषणाबाजी करत मोर्चा काढला. आमदार गुलाबराव पाटील स्वत: या मोर्चात सहभागी झाले होते.
शिवसेना जिल्हा कार्यालयासमोर सकाळी १०.३० वाजता जळगाव तालुक्यातील विविध गावांमधील शेतकरी एकत्र आले होते. ११ वाजता मोर्चास प्रारंभ झाला. अटक करा, अटक करा शेतकर्‍यांना अटक करा, दबावाखाली काम करणार्‍या पोलीस प्रशासनाचा निषेध असो...अशा विविध घोषणा देत हा मोर्चा टॉवर चौक, स्टेडियम चौक, बस स्टॅँड, स्वातंत्र्य चौकामार्गे जिल्हापेठ पोलिस स्टेशनवर धडकला.
सर्वांना अटक करा
दष्काळाने त्रस्त शेतकर्‍यांना विमा रकमेचा आधार ठरणार असल्याने त्या संदर्भात चौकशीस गेलेल्या व सनदशिर मार्गाने आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर दरोडा, दंगलीचा गुन्हा दाखल करण्याच्या भूमिकेचा शेतकरी निषेध करत होते.
-----
आव्हाणेे येथे जमले शेतकरी
सकाळी १० वाजता आव्हाने येथे परिसरातील शेतकरी एकत्र आले होते. आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, कढोली, भादली, कानळदा आदी भागातून हे शेतकरी एकत्र आले होते. आव्हाणे येथे एकत्र आल्यानंतर ट्रॅक्टर व आपापल्या वाहनांनी हे शेतकरी शिवसेना जिल्हा कार्यालयासमोर आले. या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती. येथेही प्रचंड घोषणा देण्यात येत होत्या.
------
अशा होत्या मागण्या
-सनदशिर मार्गाने आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवरील दंगलीचा गुन्हा रद्द करा
- आपल्या न्याय हक्काबाबत विचारणा करण्यास गेलेल्या शेतकर्‍यांवरील दरोड्याचे कलम रद्द करा
- या प्रकाराची पूर्ण चौकशी होईपर्यंत कुणावरही कारवाई होता कामा नये
- शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काच्या विम्याच्या रकमा त्वरित दिल्या जाव्यात.
- खोट्या तक्रारी करणार्‍या जिल्हा बॅँकेतील अधिकार्‍यांवरही कारवाई केली जावी
-------