शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

ट्रेनसमोर सेल्फी काढणे पडले महागात, २ विद्यार्थी ठार

By admin | Updated: January 17, 2017 08:57 IST

स्टंट करण्याच्या नादात ट्रेनसमोर सेल्फी काढणे दिल्लीतील दोन विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - सध्या सर्वत ' सेल्फी'चे वेड पसरले असून प्रत्येक क्षण कॅमे-यात कैद करण्यासाठी तरूणांची धडपड सुरू असते. मात्र या सेल्फीचा मोह दोन तरूणांच्या जीवावर बेतला असून ट्रेनसमोर सेल्फी काढतानाच ट्रेनने धडक दिल्याने तरूणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. 
फेसबूकवर पोस्ट करण्यासाठी स्टंट करत फोटो काढण्याच्या नादात  ९वी आणि १०वीच्या दोन विद्यार्थ्यांचा जीव गेला. यश आणि शुभण असे मृत विद्यार्थ्यांचे नाव असून ते आपल्या ५-६ मित्रांसह शनिवारी अक्षरधाम मंदिराजवळील रेल्वे ट्रॅकजवळ फोटो काढण्यासाठी गेले होते. त्यासाठी त्यांनी १३०० रुपये देऊन एक कॅमेराही भाड्याने घेतला होता. सर्वजण एकेक करून फोटो काढत असतानाचा मागून आलेल्या ट्रेनने यश आणि शुमभ यांना उडवले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. 
त्यांच्या मित्रांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्या सर्वांना आपला पोर्टफोलिओ तयार करायचा होता आणि त्यासाठीच त्यांनी रेल्वे ट्रॅकची निवड केली. मात्र ते फोटो काढण्यात एवढे मग्न झाले की मागून कधी ट्रेन आली हे त्यांना समजलंच नाही आणि यश व शुभमचा दुर्दैवी मृत्यू झाला. 
  •  
  •