मारहाणीच्या गुन्ात हिरापूरचे चौघे निर्दोष
By admin | Updated: February 23, 2016 00:03 IST
जळगाव : मारहाणीच्या गुन्ात हिरापूर, ता.चाळीसगाव येथील चौघांना चाळीसगाव न्यायालयानेसुनावलेली कारावास व दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.के. पटनी यांनी अपिलाच्या सुनावणीअंती रद्द केली. त्यामुळे या गुन्ातील चौघांची निर्दोष मुक्तता झाली आहे.
मारहाणीच्या गुन्ात हिरापूरचे चौघे निर्दोष
जळगाव : मारहाणीच्या गुन्ात हिरापूर, ता.चाळीसगाव येथील चौघांना चाळीसगाव न्यायालयानेसुनावलेली कारावास व दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.के. पटनी यांनी अपिलाच्या सुनावणीअंती रद्द केली. त्यामुळे या गुन्ातील चौघांची निर्दोष मुक्तता झाली आहे.या खटल्याची थोडक्यात हकिकत अशी, हिरापूर येथील सुमनबाई दयाराम म्हस्के, अशोक दयाराम म्हस्के, सुनील दयाराम म्हस्के, शोभा अशोक म्हस्के व सुनीता सुनील म्हस्के यांना शेतीच्या वादातून एक ऑगस्ट १९९९ रोजी दुपारी १२ वाजता मारहाण झाली होती. ही मारहाण विक्रम गोविंदा देवकर, नर्मदाबाई विक्रम देवकर (दोघे रा.हिरापूर), निवृत्ती विक्रम देवकर व हिरामण शंकर पारधी (दोघे रा.चाळीसगाव) यांनी केली होती. याप्रकरणी सुमनबाई म्हस्के यांच्या फिर्यादीवरून वरील चौघांविरुद्ध चाळीसगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर या गुन्ाच्या खटल्यात चाळीसगाव न्यायालयाने चौघांना २९ सप्टेंबर २००८ रोजी कारावास व दंडाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरुद्ध चौघांनी सत्र न्यायालयात अपील केले होते. या अपिलाच्या अंतिम सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांची शिक्षा रद्द केली. आरोपींतर्फे ॲड.वसंत ढाके, ॲड.भारती ढाके यांनी तर सरकारतर्फे ॲड.अनुराधा वाणी यांनी काम पाहिले.