शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

छळाला कंटाळून चार खेळाडूंनी घेतले विष!

By admin | Updated: May 8, 2015 08:30 IST

केरळमधील अलपुझा येथे असणाऱ्या स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (साई) अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रामध्ये वॉटर स्पोटसचे प्रशिक्षण घेत असलेल्या चार अल्पवयीन मुलींनी ‘ओथालांगा’

अलपुझा/नवी दिल्ली : केरळमधील अलपुझा येथे असणाऱ्या स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (साई) अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रामध्ये वॉटर स्पोटसचे प्रशिक्षण घेत असलेल्या चार अल्पवयीन मुलींनी ‘ओथालांगा’ हे विषारी फळ खाऊन सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात अपर्णा रामचंद्रन या १५वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर अत्यवस्थ असलेल्या तिघींवर अलपुझा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. वसतिगृहाची वॉर्डन आणि प्रशिक्षकांनी केलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप अपर्णाच्या कुटुंबीयांनी केला आहे. क्रीडा क्षेत्राला हादरवून टाकणाऱ्या या घटनेचे तीव्र पडसाद संसदेत उमटले. केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले तरी दोषींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि अंत्यसंस्कार करणार नाही शिवाय राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशाराही अपर्णाच्या पालकांनी दिला आहे.‘साई’च्या अलपुझा केंद्रातील वसतिगृहात बुधवारी दुपारी ही घटना घडली. त्यानंतर चार तासांनी त्यांना अलपुझा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. साई केंद्रावर वॉटर स्पोर्ट्सचे प्रशिक्षण घेत असलेल्या या खेळाडूंच्या कुटुंबीयांनी मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोप केला आहे. केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन दिले आहे.