शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इसिसमध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या चार भारतीय युवकांना सीरियात अटक

By admin | Updated: January 15, 2016 02:02 IST

इस्लामिक स्टेटच्या (इसिस) बाजूने लढण्याच्या उद्देशाने निघालेल्या चार भारतीय युवकांना सिरियात अटक करण्यात आली आहे. भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले सिरियाचे

नवी दिल्ली : इस्लामिक स्टेटच्या (इसिस) बाजूने लढण्याच्या उद्देशाने निघालेल्या चार भारतीय युवकांना सिरियात अटक करण्यात आली आहे. भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले सिरियाचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री वालिद अल मौअलेम यांनी बुधवारी ही माहिती दिली. हे चारही भारतीय युवक जॉर्डनमार्गे सिरियात घुसले होते आणि इसिसमध्ये सामील होण्याआधीच त्यांना अटक करण्यात आली, असे मौअलेम यांनी सांगितले.इसिसमध्ये सामील होण्याच्या हेतूने सिरियात आलेल्या या चारही भारतीयांना सध्या दमास्कसच्या कारागृहात ठेवण्यात आले आहे. सिरियात येऊन या युवकांना भेटा आणि त्यांना भारतात परत आणा, असे आम्ही भारतीय अधिकाऱ्यांना सांगितले आहे. दहशतवादविरोधी आघाडीवर सहकार्य आणि गुप्तचर माहितीचे आदानप्रदान या दोन मुख्य हेतूंसाठी आपला हा भारत दौरा आहे,’ असे मौअलेम म्हणाले.किमान २३ भारतीय, ज्यांपैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे, इसिसमध्ये सामील झाल्याचा संशय आहे. सिरियात या चार युवकांना अटक झाल्यामुळे आता ही संख्या २७ वर पोहोचली. मौअलेम म्हणाले, ‘इराकमध्ये ३९ भारतीय इसिसच्या ताब्यात असल्याचा संशय आहे. या भारतीयांच्या सुटकेसाठी सिरिया तूर्तास तरी मदत करण्याच्या स्थितीत नाही. मला क्षमा करा. आम्ही काहीही करू शकत नाही. तुम्हाला इर्दोगान (तुर्की अध्यक्ष) यांना सांगावे लागेल.’मौअलेम यांनी सिरियातील संकटासाठी तुर्की, सौदी अरेबिया आणि कतार या देशांना जबाबदार धरले. हे देश दहशतवादी गटांना पाठिंबा देत आहेत, असा स्पष्ट आरोप त्यांनी केला. इसिसविरुद्ध लढण्यासाठी सिरियाला लष्करी मदत केल्याबद्दल त्यांनी रशियाचे आभारही मानले. रशियाच्या लष्करी मदतीमुळेच आम्ही इसिसच्या ताब्यातील २० ठिकाणे मुक्त करू शकलो. ही मदत अशी सुरू राहिली तर त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच पाहायला मिळतील. अमेरिकेने जे १८ महिन्यांत मिळविले ते रशियाने अवघ्या तीन महिन्यांत मिळविले, असे मौअलेम म्हणाले.परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यासोबत झालेली चर्चा उपयुक्त ठरली. सिरियातील संकट हा आमच्या चर्चेचा विषय होता. दहशतवाद हा कुणा एका देशाचा नसतो, असे माझे मत आहे. जगात जे काही घडते आहे, त्याचा सिरियावरही परिणाम होत आहे, असे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)