शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

अन्न सुरक्षा कायदा संपूर्ण देशात लागू

By admin | Updated: November 4, 2016 06:07 IST

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आता संपूर्ण देशात लागू झाला आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आता संपूर्ण देशात लागू झाला आहे. तामिळनाडू आणि केरळ आतापर्यंत या कायद्याच्या कक्षेबाहेर होते. तथापि, १ नोव्हेंबरपासून ही राज्येही पटलावर आली आहेत. या कायद्यामुळे ८० कोटी लोकांना सवलतीत धान्य मिळणार असून, केंद्राला त्यापोटी वार्षिक १ लाख ४0 हजार कोटी एवढे अनुदान द्यावे लागणार आहे. आम्ही सत्तेत आलो तेव्हा, केवळ ११ राज्यांत या कायद्याची अंमलबजावणी होत होती. मात्र, आता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात याचा अंमल सुरू झाली. धान्य थेट विक्रेत्यांच्या दरवाजापर्यंत पोहोचते करण्यात येत असून, विक्रेत्यांचे कमिशनही वाढविण्यात आले आहे, असे केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान म्हणाले. केरळ आणि तामिळनाडू ही दोनच राज्ये राहिली होती. तेथेही १ नोव्हेंबरपासून हा कायदा लागू झाला. २०१३ मध्ये संसदेने संमत केलेल्या या कायद्यांतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीला केवळ एक ते तीन रुपये किलो दराने दरमहा ५ किलो धान्य पुरविणार आहे.ई-पीओएस उपकरणांद्वारे धान्य वितरणइलेक्ट्रॉनिक पॉइंट आॅफ सेल (ई-पीओएस) उपकरणाद्वारे धान्याचे वितरण करण्यासाठी स्वस्त धान्य दुकाने स्वयंचलित प्रणालीने जोडण्यात येत आहेत. हे उपकरण लाभार्थ्याची शहानिशा करण्यासह किती धान्य दिले याची नोंद ठेवते. सध्या १ लाख ६१ हजार ८५४ स्वस्त धान्य दुकानांत ई-पीओएस उपकरणांद्वारे धान्य वितरण सुरू आहे. धान्य पोहोचविण्यासाठी...सार्वजनिक वितरणव्यवस्था सुरळीत चालावी म्हणून केंद्र धान्याची आंतरराज्यीय वाहतूक, हाताळणी आणि विक्रेत्याचे कमिशन याचा खर्च भागविण्यासाठी अर्थसाहाय्य पुरवीत आहे. २०१६-१७ मध्ये राज्यांना आतापर्यंत १,८७४ कोटी रुपये देण्यातआले आहेत, असे ते म्हणाले.>७१% शिधापत्रिका (रेशन कॉर्ड) आधार कार्डशी जोडण्यात आल्या असून, उर्वरित शिधापत्रिकाही लवकरच जोडल्या जातील. शिधापत्रिका आधार कार्डशी जोडण्याच्या प्रक्रियेमुळे २.६२ कोटी शिधापत्रिका वगळल्या गेल्या आहेत.>सवलतीतील धान्याचा भार 11726ू१ रुपये दरमहा