शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यपदार्थ एखाद्या समुदायाच्या संसकृतीचा अविभाज्य भाग नाही

By admin | Updated: December 6, 2015 02:07 IST

गोवंश हत्याबंदी : राज्य शासनाचे प्रतिज्ञापत्र

गोवंश हत्याबंदी : राज्य शासनाचे प्रतिज्ञापत्र
मुंबई : एखादा खाद्यपदार्थ कोणत्याही समुदायाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असू शकत नाही. तसे झाल्यास भारतात खाद्यपदार्थांवरूनच अनेक संस्कृती निर्माण होतील. संस्कृती यापेक्षा श्रेष्ठ आहे, असे म्हणत राज्य सरकारने महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारित) कायदा, २०१५चे समर्थन करत या कायद्यामुळे कोणत्याही धर्माच्या मुलभूत अधिकारांवर गदा येत नसल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे म्हटले.
या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिकांवरील अंतिम सुनावणीस न्या. अभय ओक व न्या. एस. सी. गुप्ते यांच्या खंडपीठापुढे शनिवारपासून सुरुवात झाली. एका याचिकाकर्त्याच्यावतीने ज्येष्ठ वकील ॲस्पी चिनॉय यांनी कायद्यातील कलम ५(डी), ९(ए) बाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले.
सुधारित कायद्यांतर्गत बैलाचे मांस बाळगणे, खाणे, तसेच त्यांची वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अनेक राज्यांत बैलांचे मांस खाण्यास, बाळगण्यास, विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र बैलांचे मांस आयात करण्यास बंदी घालण्यात आलेली नाही. राज्यात काही ठिकाणी बैलांची बेकायदेशीरपणे कत्तल झाली असली तरी राज्य सरकार सर्वांनाच वेठीला धरू शकत नाही. त्या घटनांमुळे सर्वांवर बैलाचे मांस बाळगणे, व्रिकी करणे, खाणे किंवा आयात करण्यास बंदी घातली जाऊ शकत नाही आणि त्यासाठी त्याला कारावासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद ॲड. चिनॉय यांनी केला.
राज्य सरकारने खंडपीठापुढे प्रतिज्ञापत्र सादर करत कायद्यातील तरतुदींचे समर्थन केले आहे. भारतात अनेक पंथाचे लोक राहतात आणि त्यांच्या आहारात भिन्नता आहे. समुहाच्या खाण्याच्या सवयीवरून त्याची संस्कृती ठरवली जाऊ शकत नाही. बैलाचे मांस खाणे, ही आपली संस्कृती आहे, असा कोणी दावा करत असेल तर संस्कृती ही खाण्याच्या सवयींपेक्षा खूप श्रेष्ठ आहे, असे राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या याचिकांवरील पुढील सुनावणी ९ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)