शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करा : ऋषिकेश कोराणे

By admin | Updated: January 21, 2017 02:11 IST

सरवडे : दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहन अपघातांचे प्रमाण वाढत आहे. वाहतुकीचे नियम पाळून वाहने चालविल्यास अपघातापासून दूर राहता येते. सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीचे नियम पाळूनच वाहन चालविणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे मोटारवाहन निरीक्षक ऋषिकेश कोराणे यांनी केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर व बिद्री सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सुरक्षा सप्ताह कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी कारखान्याच्या वाहन अड्ड्यातील अनेक वाहनांवर रिप्लेक्टर बसविण्यात आले.

सरवडे : दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहन अपघातांचे प्रमाण वाढत आहे. वाहतुकीचे नियम पाळून वाहने चालविल्यास अपघातापासून दूर राहता येते. सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीचे नियम पाळूनच वाहन चालविणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे मोटारवाहन निरीक्षक ऋषिकेश कोराणे यांनी केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर व बिद्री सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सुरक्षा सप्ताह कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी कारखान्याच्या वाहन अड्ड्यातील अनेक वाहनांवर रिप्लेक्टर बसविण्यात आले.
यावेळी कोराणे म्हणाले, ग्रामीण भागातील रस्त्यांवर ऊस वाहतुकीच्या वाहनांची वर्दळ असते. ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर-ट्रॉलीज व बैलगाड्यांना सिग्नल नसल्याने रिप्लेक्टरची नितांत गरज असते. रात्रीच्या प्रवासात रिप्लेक्टर महत्त्वाचे काम करीत असल्याने अपघातापासून बचाव होण्यास मदत करतात. यापुढे रिप्लेक्टर न लावणार्‍या वाहनचालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
कार्यक्रमास सहायक मोटारवाहन निरीक्षक पल्लवी पांडव, बिद्री कारखान्याचे वाहनविभागप्रमुख महेश गंगापुरे, शेती अधिकारी महेश कावणे, सिव्हिल इंजिनिअर बी. बी. पाटील, सुरक्षा विभागप्रमुख बी. पी. पाटील, ज्ञानदेव फराकटे यांच्यासह कारखान्याचे कर्मचारी, वाहनचालक-मालक उपस्थित होते. (वार्ताहर)
------

फोटो
बिद्री : वाहन सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी मोटारवाहन निरीक्षक ऋषिकेश कोराणे, पल्लवी पांडव, महेश गंगापुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.