शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये एक फूल तीन माली! एकाच पत्नीवर तिघांनी केला दावा

By admin | Updated: April 5, 2017 18:48 IST

एक फूल दोन माली या नावाचा चित्रपट पाहिला असेल. पण बिहारमधील दरभंगा पोलीस ठाण्यातील पोलीस अशाच एका विचित्र प्रकरणाचा गुंता सोडवण्याचे आव्हान

ऑनलाइन लोकमत
पटना, दि. 5 -  एक फूल दोन माली हा वाकप्रचार तुम्ही ऐकला असेलच. तसेच या नावाचा चित्रपटही पाहिला असेल. पण बिहारमधील दरभंगा पोलीस ठाण्यातील पोलीस अशाच एका विचित्र प्रकरणाचा गुंता सोडवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. या ठाण्यात दाखल झालेल्या एका प्रकरणात एका महिलेवर तिच्या तीन पतींनी हक्क सांगितला आहे. 
या प्रकरणातील मुख्य व्यक्ती राधिका नामक महिला असून, तिने आतापर्यंत तीन विवाह केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचे पहिले लग्न कुटुंबीयांनी संजय झा नामक तरुणाशी जबरदस्तीने लावून दिले होते. त्यामुळे नाखूश असलेली राधिका विवाहाला काही दिवस होत नाही तोच सासरहून गायब झाली.
 याचदरम्यान तिची ओळख मोहन सिंग याच्याशी झाली. त्यानंतर तिने मोहन सिंगशी विवाहदेखील केला. या दोघांनाही एक मूलदेखील झाले. पण दुसऱ्या पतीसोबतसुद्धा ती फार काळ नांदू शकली नाही. त्यानंतर येथूनही ती गायब झाली. पुढे राधिकाची ओळख शिवशंकर राय या इसमाशी झाली. एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या या दोघांनीह विवाहसुद्धा केला. विशेष म्हणजे शिवशंकरसुद्धा आधीपासून विवाहित होता. पण तरीसुद्धा दोघेही एकमेकांना सोडू इच्छित नाहीत. 
राधिकासाठी शिवशंकर आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्यास तयार आहे. पण राधिकाचा दुसरा पती मोहन मात्र तिला सोडण्यास तयार नाही. राधिकाने मुलाचा ताबा तरी आपल्याकडे द्यावा अशी मोहनची मागणी आहे. पण, त्यालाही तिने नकार दिला आहे.  त्यामुळे या प्रकरणात काय निर्णय द्यावा हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. गुंता वाढल्याने पोलिसांनी हे प्रकरण न्यायालयात नेण्याचा निर्णय घेतला आहे. पण या विचित्र प्रेमप्रकरणामुळे एकाच वेळी अनेक कुटुंबांना चिंतेत टाकले आहे. आता या विचित्र प्रकणावर न्यायालय काय निर्णय देते. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.