शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

Flash Back फेब्रुवारी २०१४

By admin | Updated: December 16, 2014 00:00 IST

मुंबई किना-यावरील भारतीय नौदलाच्या "सिंधुरत्न" या पाणबुडीला झालेल्या अपघातानंतर नौदल प्रमुख नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल डी. के. जोशी यांनी पदाचा राजीनामा दिला.अरूणाचल प्रदेशमधील आमदाराचा मुलगा निदो तानियाची केशरचनेवरून थट्टा केली असता त्याचे त्या दुकानदारांशी भांडण झाले. तेव्हा संतापाच्या भरात या दुकानदारांनी केलेल्या बेदम मारहाणीत निदोचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिल्लीतल्या भेदभावाच्या वागणुकीच्या ...

मुंबई किना-यावरील भारतीय नौदलाच्या "सिंधुरत्न" या पाणबुडीला झालेल्या अपघातानंतर नौदल प्रमुख नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल डी. के. जोशी यांनी पदाचा राजीनामा दिला.

अरूणाचल प्रदेशमधील आमदाराचा मुलगा निदो तानियाची केशरचनेवरून थट्टा केली असता त्याचे त्या दुकानदारांशी भांडण झाले. तेव्हा संतापाच्या भरात या दुकानदारांनी केलेल्या बेदम मारहाणीत निदोचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिल्लीतल्या भेदभावाच्या वागणुकीच्या निषेधार्थ पंतप्रधान मनमोहन सिंगांना भेटायला आलेले निदोचे कुटुंबिय.

मायक्रोसॉफ्ट या जगातील नंबर एकच्या सॉफ्टवेअर कंपनीच्या सीईओपदी भारतीय वंशाच्या सत्या नाडेला यांची नियुक्ती करण्यात आली. गेल्या २२ वर्षांपासून मायक्रोसॉफ्टमध्ये कार्यरत असलेल्या नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर व टूल्स विभागात क्रांतीकारी बदल करुन संगणक वापरण्यास सोपा करण्यात मोठी कामगिरी बजावली.

अखंड आंध्र प्रदेशच्या समर्थकांनी तेलंगण राज्याच्या निर्मितीचे विधेयक सादर होताच संसदेत चक्क "पेपर स्प्रे" मारण्यास सुरूवात केली. या गोंधळात हाणामारीचाही प्रकार घडला ज्यात अनेक सदस्य जखमी झाले. पेपर स्प्रेचा शिकार झालेले एक खासदार.

दिल्ली विधानसभेत लोकपाल विधेयक मंजूर करण्यात अपयशी ठरले. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला. दिल्लीत "आप"चे सरकार अवघे ४९ दिवस टिकले. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

तीव्र विरोधाला न जुमानता अखेर लोकसभेत आंध्र प्रदेशचे विभाजन करून स्वतंत्र तेलंगण राज्याची निर्मिती करणारे विधेयक मंजूर करण्यात आले. या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करताना तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव.

सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेक-यांची फाशी रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी सातही मारेकर्‍यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. तामिळनाडू सरकारच्या या निर्णयामुळे मोठा गदारोळ माजला होता. मात्र त्यानंतर न्यायालयाने तामिळनाडू सरकारच्या या निर्णयाला स्थगिती दिली होती.

गुजरात दंगली प्रकरणी न्यायालयाने नरेंद्र मोदींना क्लीन चीट दिली असून आता त्या संबंधी कोणतेही भाष्य करणे योग्य ठरणार नाही असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना क्लीन चीट दिली होती. एकदा कोर्टाने निकाल दिल्यानंतर त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ते म्हणाले होते. पवारांच्या या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात पवार-मोदी जवळिकीची चर्चा रंगली होती.

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय व गुजरातचे तत्कालिन गृहमंत्री अमित शाह यांना नोटीस बजावली.

देशातील जनतेपर्यंत चुकीचा संदेश पोहोचवणार्‍या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांना चिरडून टाका असे वादग्रस्त वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी एका सभेत केले होते. त्यावरून मोठा गदारोळ माजताच शिंदे यांनी आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हे तर सोशल मीडियाला चिरडून टाका असे म्हटल्याचे सांगत घूमजाव केले.

प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकचा जनक असलेल्या मार्क झुकेरबर्गने सगळ्यांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनलेले व्हॉटसअ‍ॅप विकत घेतले. तब्बल १९ बिलियन डॉलर्सना त्याने हे डील केले.

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि सर्वत्र नरेंद्र मोदींची लाट पसरली. गुजरात दंगल प्रकरणी राजधर्म न पाळल्याचा ठपका असलेल्या मोदींना नऊ वर्षे व्हिसा नाकारणा-या अमेरिकेने पडती भूमिका घेतली. अमेरिकेच्या राजदूत नॅन्सी पॉवेल यांनी भारतभेटीदरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या मोदींची भेट घेतली.