घरगुती गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरणार्या पाच जणांवर गुन्हा दाखल
By admin | Updated: March 8, 2015 00:31 IST
भिवंडी : शहरातील पायल टॉकिज शेजारील गल्लीत असलेल्या गाळ्यात घरगुती सिलेंडर मधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरणार्या पाच जणांवर भोईवाडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरगुती गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरणार्या पाच जणांवर गुन्हा दाखल
भिवंडी : शहरातील पायल टॉकिज शेजारील गल्लीत असलेल्या गाळ्यात घरगुती सिलेंडर मधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरणार्या पाच जणांवर भोईवाडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील ठाणारोड पायल टॉकिज शेजारील प्रभाग समिती क्र.४ च्या कार्यालयाकडे जाणार्या मार्गावर गाळा क्र.६१२ मध्ये गेल्या काही महिन्यापासून गॅस सिंलेडरमध्ये भरण्याचे काम सुरू होते. शासनाने सर्वसामान्य जनतेस अनुदानीत दराने दिलेले घरगुती वापराचे गॅस सिलेंडर बेकायदेशीररित्या प्राप्त करून त्याचा साठा गाळ्यात केला होता. तेथे घरगुती वापराचा गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरून ते चढ्या भावाने काळ्याबाजारात विकत असल्याची माहिती रेशनिंग कार्यालयाच्या भरारी पथकास मिळाली असता त्यांनी शुक्रवारी दुपारी छापा टाकून ४२२ सिलेंडर व दोन गॅस शेगडीच्या नळ्या जप्त केल्या. हा उद्योग मे.सॅफ्को गॅस एजन्सीच्या संगनमताने करून गरजू ग्राहकांना घरगुती गॅसपासून वंचीत ठेवले व कृत्रीम टंचाई निर्माण केली.तसेच शासनाची व गॅस ग्राहकांची दिशाभूल केली,अशी तक्रार भरारी पथकातील तानाजी बाबूराव मोरे यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार करून इरफान खान रफीउल्ला खान,कृष्णा दत्तात्रय शिकारे,मोसीन यासीन शेख,अमीन नमीर शेख,इरफान इक्बाल मोमीन या पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही महिन्यापासून मोबाईलवर कंपनीत फोन करूनही वेळेवर गॅस मिळत नसल्याने नागरिकांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. -------------------------------------------------(प्रतिनिधी/ पंढरीनाथ कुंभार)....................................................वाचली - नारायण जाधव