साताप्पा शेरवाडे जिल्ात प्रथम
By admin | Updated: May 10, 2014 19:41 IST
तुरंबे : जिल्हास्तरीय प्राथमिक शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत केंद्रशाळा ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथील शिक्षक साताप्पा श्रीपती शेरवाडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
साताप्पा शेरवाडे जिल्ात प्रथम
तुरंबे : जिल्हास्तरीय प्राथमिक शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत केंद्रशाळा ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथील शिक्षक साताप्पा श्रीपती शेरवाडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित केलेल्या प्राथमिक शिक्षक गटातील वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रत्येक तालुक्यातून एक व नगरपालिका, शहर व नगरपरिषद यांचे १७ प्रतिनिधी सहभागी झाले होते. राष्ट्राच्या जडणघडणीसाठी शिक्षकांचे योगदान हा विषय शेरवाडे यांनी मांडला. त्यांना प्रा. चंद्रशेखर कांबळे, राजेंद्र नायकवडी यांचे मार्गदर्शन व गटशिक्षणाधिकारी माधवराव मांडे, शिक्षण विस्तार अधिकारी बी. डी. टोणपे, श्रीधर कोळी, डी. ए. पाटील व केंद्रप्रमुख श्री चौत्रे यांचे प्रोत्साहन लाभले. मान्यवरांच्या उपस्थितीत शेरवाडे यांचा गौरव करण्यात आला.फोटो - कोल्हापूर जिल्हास्तर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक एससीईआयटीचे संचालक नामदेवराव जरग यांच्या हस्ते स्वीकारताना सातापा शेरवाडे. सोबत आर. आर. भोई.