विदर्भातील पहिले पोलीस लॉन्स अकोल्यात राणीसती धामसमोरील मैदानावर कामास सुरुवात
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
अकोला: अकोला पोलीस दलाला मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध व्हावी. या दृष्टिकोनातून विदर्भातील पहिले पोलीस लॉन्स उभारण्याचे काम जिल्हा परिषद रोडवरील राणीसती धाम मंदिरासमोरील भव्य जागेमध्ये गत काही दिवसांपासून सुरू करण्यात आले. लॉन्स तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, शहरातील एका नर्सरीकडे हे काम सोपविण्यात आले आहे.
विदर्भातील पहिले पोलीस लॉन्स अकोल्यात राणीसती धामसमोरील मैदानावर कामास सुरुवात
अकोला: अकोला पोलीस दलाला मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध व्हावी. या दृष्टिकोनातून विदर्भातील पहिले पोलीस लॉन्स उभारण्याचे काम जिल्हा परिषद रोडवरील राणीसती धाम मंदिरासमोरील भव्य जागेमध्ये गत काही दिवसांपासून सुरू करण्यात आले. लॉन्स तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, शहरातील एका नर्सरीकडे हे काम सोपविण्यात आले आहे. वर्षभरामध्ये पोलिसांसाठी विविध मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होते. या कार्यक्रमांसाठी पोलीस दलाला भाडेतत्त्वावर अनेकदा सभागृह घ्यावे लागते. तसेच पोलीस मुख्यालयामध्ये असलेले मनोरंजन सभागृहात आकाराने लहान असल्याने याठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करणे शक्य होत नाही. पोलीस दलासाठी स्वत:चे आणि स्वतंत्र असे सभागृह किंवा ठिकाण असावे, या दृष्टिकोनातून सहायक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी शहरामधील खुल्या भूखंडांची पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांना जिल्हा परिषद रोडवरील राणीसती धाम मंदिरासमोर काटेरी झाडाझुडपांनी आणि नाल्यांनी वेढलेला भूखंड दिसून आला. त्यांनी या भूखंडाची निवड पोलीस लॉन्ससाठी केली. रस्त्यापासून ६ ते ७ फूट खोल असलेल्या भूखंडाला समतल करण्याचे काम सुरू करण्याविषयी त्यांनी सूचना केली. त्यानुसार पोलीस प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी मेहतीने भूखंडावरील वाढलेली झाडेझुडपे कापली. शहरातील इतर ठिकाणांवरची माती ट्रकद्वारे आणून या ठिकाणी टाकण्यात आली. जवळपास ५0 टक्के भूखंड समतल काम करण्याचे पूर्ण झाले आहे. भूखंड समतल झाल्यानंतर शहरातील एका नर्सरीमार्फत त्यावर हिरवेगार गवताचे लॉन्स तयार करण्यात येईल. विविध प्रकारची शोभीवंत फुलझाडेदेखील या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. लॉन्सचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर लॉन्सच्या चारही बाजूंनी संरक्षण कुंपण किंवा आवारभिंतसुद्धा उभारण्याची योजना आहे. सुचना: बातमीमध्ये जोड आहे. 00000000000000000000000000