शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी २५० रूग्ण शस्त्रक्रियेस पात्र हजार जणांची तपासणी: आज विविध भागात मोहीम

By admin | Updated: January 2, 2016 08:32 IST

जळगाव : महा आरोग्य शिबिराच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू झालेल्या प्राथमिक आरोग्य तपासणीत पहिल्याच दिवशी एक हजारावर रुग्णांची तपासणी होऊन २५० रुग्ण विविध शस्त्रक्रीयेसाठी पात्र ठरले आहेत. दरम्यान, जिल्हा भाजपा कार्यालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी याप्रश्नी बैठक घेऊन नागरिकांना लाभ घेण्याविषयी कार्यकर्त्यांनी आवाहन करावे अशा सूचना केल्या.

जळगाव : महा आरोग्य शिबिराच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू झालेल्या प्राथमिक आरोग्य तपासणीत पहिल्याच दिवशी एक हजारावर रुग्णांची तपासणी होऊन २५० रुग्ण विविध शस्त्रक्रीयेसाठी पात्र ठरले आहेत. दरम्यान, जिल्हा भाजपा कार्यालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी याप्रश्नी बैठक घेऊन नागरिकांना लाभ घेण्याविषयी कार्यकर्त्यांनी आवाहन करावे अशा सूचना केल्या.
९ ते १२ जानेवारी दरम्यान शहरात महाआरोग्य शिबिर होत आहे. या शिबिराच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रभाग निहाय आरोग्य तपासणी केली जात आहे. या मोहिमेस शुक्रवारी प्रारंभ झाला. प्रभाग १ ते ६ मध्ये ही तपासणी झाली. सुमारे एक हजार रूग्णांनी याचा लाभ घेतला. त्यापैकी २५० रुग्ण विविध शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले. त्यातील ७० रुग्णांचे एक्सरे, सीटी स्कॅन, एमआरआय आदी तपासण्याही मोफत करण्यात आल्या.
पदाधिकार्‍यांनी दिली भेट
शिवाजी नगरातील मराठा मंगल कार्यालयात झालेल्या आरोग्य तपासणीच्या ठिकाणी २०० रुग्णांची तपासणी झाली. उपमहापौर सुनील महाजन, स्थायी समितीचे सभापती नितीन बरडे, नगरसेवक कैलास सोनवणे, उत्तम शिंदे, गायत्री शिंदे, भगवान सोनवणे, विशाल वाघ आदींनी तपासणीच्या ठिकाणी भेट देऊन रुग्णांना मदत केली.
----
भाजपा कार्यालयात बैठक
शहरात होत असलेल्या मोफत महा आरोग्य कुंभाचा नागरिकांना लाभ घ्यावा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यासाठी नागरिकांना सहकार्य करावे असे आवाहन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपा कार्यालयात झालेल्या बैठकीत केले. शिबिराविषयी माहितीही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. प्राप्त होणार्‍या आधुनिक रूग्णवाहिका, शववाहिका व अन्य सुविधांची माहिती दिली. जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार सुरेश भोळे, मनपा गटनेते डॉ. अश्विन सोनवणे, गोविंद अग्रवाल, दीपक सुर्यवंशी, सुभाष शौचे, बंडू काळे, भगत बालाणी, दिेनेश जोशी व इतर उपस्थित होते.
-----