शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर सचिन जाधव पोलिसांना शरण राजस हॉस्पिटलमधील दुहेरी हत्या प्रकरण : हत्याकांडाचे कारण गुलदस्त्यातच

By admin | Updated: May 11, 2016 22:14 IST

जळगाव : रिंगरोडवरील राजस हॉस्पिटलमध्ये ५ मे रोजी मध्यरात्रीनंतर घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील प्रमुख संशयित आरोपी सचिन गुमानसिंग जाधव हा ६ दिवसानंतर बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलिसांना शरण आला. अटकेनंतर पोलिसांनी त्याची प्राथमिक चौकशी केली. त्यात सचिनने संपूर्ण घटनाक्रम उलगडला. मात्र, हे हत्याकांड का केले? याबाबत त्याने मौन पाळल्याने हत्याकांडाचे रहस्य गुलदस्त्यातच राहिले आहे.

जळगाव : रिंगरोडवरील राजस हॉस्पिटलमध्ये ५ मे रोजी मध्यरात्रीनंतर घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील प्रमुख संशयित आरोपी सचिन गुमानसिंग जाधव हा ६ दिवसानंतर बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलिसांना शरण आला. अटकेनंतर पोलिसांनी त्याची प्राथमिक चौकशी केली. त्यात सचिनने संपूर्ण घटनाक्रम उलगडला. मात्र, हे हत्याकांड का केले? याबाबत त्याने मौन पाळल्याने हत्याकांडाचे रहस्य गुलदस्त्यातच राहिले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका हॉटेलजवळ येऊन थांबला होता. या प्रकाराची माहिती होताच, जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकातील कर्मचार्‍यांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. दुपारी १२.३० वाजेनंतर त्याला जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याच्या अटकेची कार्यवाही झाली. पत्नी व लेकीची हत्या का केली? याबाबत पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत सचिनची चौकशी केली. परंतु त्याने याविषयी कोणतीही माहिती दिली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
आज न्यायालयात हजर करणार
सचिन जाधव याला जिल्हापेठ पोलीस गुरुवारी दुपारच्या सुमारास न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे.