शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

विजय मल्ल्यांना अखेरचे समन्स

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ‘युनायटेड स्पिरीट’चे माजी चेअरमन विजय मल्ल्या यांना शनिवारी तिसरे आणि शेवटचे समन्स पाठवून ९ एप्रिलपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

- डिप्पी वांकाणी,  मुंबईअंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ‘युनायटेड स्पिरीट’चे माजी चेअरमन विजय मल्ल्या यांना शनिवारी तिसरे आणि शेवटचे समन्स पाठवून ९ एप्रिलपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. मल्ल्या यांना पाठविलेले हे शेवटचे समन्स आहे. ते ९ एप्रिलपर्यंत हजर न झाल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. मल्ल्यांना यापूर्वी दोन वेळा समन्स बजावण्यात आले होते. दुसऱ्या समन्समध्ये त्यांना २ एप्रिल रोजी ‘ईडी’च्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ते आलेच नाहीत. त्यांनी हजर होण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी लेखी मागणी शुक्रवारी ईडीकडे केली. ‘आपण आपल्या कर्जपुरवठादारांना चार हजार कोटी रुपयांच्या परतफेडीचा प्रस्ताव दिला असून सर्वोच्च न्यायालयात ७ एप्रिल रोजी त्याबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळे हजर होण्याची मुदत मे महिन्यापर्यंत वाढवावी,’ असे मल्ल्यांनी म्हटले असल्याचे समजते.‘आम्ही त्यांना पाठविलेले हे शेवटचे समन्स आहे. आम्ही हजर होण्याची मुदत मेपर्यंत वाढवून देऊच शकत नाही. या वेळी ते हजर झाले नाहीत, तर आम्ही न्यायालयाला त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्याची विनंती करू’, असे ईडीच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मल्ल्या आलेच नाहीत तर त्यांना आणण्याचे इतरही पर्याय उपलब्ध आहेत. भारताचा ब्रिटनसोबत १९९३ पासून प्रत्यार्पण करार आहे. त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयामार्फत प्रत्यार्पण प्रक्रिया सुरू करता येऊ शकते.