प्रशिक्षणार्थी शिक्षक करणार अंतिम मूल्यांकन गुणवत्ता विकास कार्यक्रम : मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिल्या सूचना
By admin | Updated: March 8, 2015 00:30 IST
अहमदनगर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा दर्जा सुधारण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुणवत्ता विकास कार्यक्रमाचे अंतिम मूल्यांकन त्रयस्त यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी डाएट संस्थेतील प्रशिक्षणार्थी शिक्षकांची मदत घेण्यात येणार आहे. याबाबत शनिवारी जिल्हा परिषदेत जिल्ातील डीएड् कॉलेजमधील प्राचार्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी भेट बैठक घेवून सूचना दिल्या आहेत.
प्रशिक्षणार्थी शिक्षक करणार अंतिम मूल्यांकन गुणवत्ता विकास कार्यक्रम : मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिल्या सूचना
अहमदनगर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा दर्जा सुधारण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुणवत्ता विकास कार्यक्रमाचे अंतिम मूल्यांकन त्रयस्त यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी डाएट संस्थेतील प्रशिक्षणार्थी शिक्षकांची मदत घेण्यात येणार आहे. याबाबत शनिवारी जिल्हा परिषदेत जिल्ह्यातील डीएड् कॉलेजमधील प्राचार्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी भेट बैठक घेवून सूचना दिल्या आहेत. गत शैक्षणिक वर्षापासून शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दुसरी ते पाचवी या इयत्तांतील विद्यार्थ्यांना मागील इयत्तेतील किमान दहा कौशल्यावर आधारित चाचण्या घेण्यात आल्या. या कार्यक्रमात एकूण चार चाचण्या घेण्यात आल्यानंतर गुणवत्ता अधिक आढळलेल्या तीन तालुक्यात पुनर्पडताळणी करण्यात आली. आता या कार्यक्रमाचा अंतिम टप्पा पार पडणार आहे. यासाठी शेवटचे मूल्यांकन घेण्यात येणार आहे. यासाठी डाएट संस्थेमार्फत जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी शिक्षकांमार्फत मूल्यांकन करण्यात येणार आहे. यापूर्वी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी आणि एका विस्तार अधिकार्याला प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. आता सोमवारी अंतिम सुचना देऊन त्यानंतर मूल्यांकन होणार आहे. बैठकीला शिक्षणाधिकारी अशोक कडूस, निरंतर शिक्षणाधिकारी पोपट काळे, डाएट संस्थेच्या प्राचार्या चंद्रकला ठोके आणि जिल्ह्यातील डीएड् कॉलेजमधील प्राचार्य उपस्थित होते. अंतिम मूल्यांकनात जिल्ह्यातील ३ हजार ६६२ शाळांपैकी किमान तीन हजार शाळांची तपासणी होणार आहे. .................नवाल यांनी बैठकीत उपस्थितांना सूचना देतांना स्पष्ट केले की, शिक्षण आनंददायी झाले पाहिजे. यासाठी प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर दडपण येणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी एक शाळा मूल्यांकनासाठी घेण्याऐवजी शिक्षकांच्या गटाने शाळेची तपासणी करावी, असे स्पष्ट केले.................