शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवानगी वैद्यकीय महाविद्यालय चालविणार्‍या डॉक्टरांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: December 22, 2014 00:10 IST

नाशिक : शासनाची वा आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परवानगी नसताना वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोडच्या डॉ़ पुरी दाम्पत्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ भालेराव मळा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय शेजवळ यांनी डॉ़ पुरी दाम्पत्याविरोधात फिर्याद दिली आहे़

नाशिक : शासनाची वा आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परवानगी नसताना वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोडच्या डॉ़ पुरी दाम्पत्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ भालेराव मळा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय शेजवळ यांनी डॉ़ पुरी दाम्पत्याविरोधात फिर्याद दिली आहे़
शेजवळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डॉ. मोहन पुरी आणि डॉ. विजया पुरी यांनी नाशिकरोड परिसरातील त्र्यंबक कॉम्प्लेक्समध्ये इंडियन युनिर्व्हसिटी ऑफ अण्टरनेटीव्ह मेडिसीन्स ॲण्ड रिसर्च सेंटर या नावाने विद्यापीठ सुरू करून भारतीय पारंपरिक चिकित्सा योग नॅचरोपॅथी नावाचे महाविद्यालय सुरू केले़ सुमारे १० वर्षांपासून हे महाविद्यालय सुरू असून, आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना विविध पदव्याही देण्यात आल्या आहेत. अशोक दामोदर कुंभारे (रा. औरंगाबाद), बाळू गणपत गवळी, खंडू पांडू भोये, कांचन दारासिंग वळवी, गोरख कदम, अनंता टोपले (सर्व रा. त्र्यंबकेश्वर) यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांना ५ ते ६ वर्षांपूर्वी लाखो रुपये घेऊन पदवी दिल्या़ तसेच आणखी २५ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कोर्स घेण्याची परवानगी घेतली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे़
डॉ. पुरी यांच्या या महाविद्यालयास कोणतीही मान्यता नसल्याने ते विद्यार्थ्यांसह शासनाची फसवणूक करीत असल्याचा आरोप शेजवळ यांनी केला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात डॉ. मोहन पुरी व विजया पुरी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)