जळकोटमधील गुणवंतांचा सत्कार
By admin | Updated: June 12, 2015 17:37 IST
जळकोट : दहावी बोर्ड परीक्षेचा जळकोट तालुक्याचा निकाल ९२.६४ टक्के लागला आहे. या गुणवंतांचा सत्कार बुधवारी करण्यात आला.
जळकोटमधील गुणवंतांचा सत्कार
जळकोट : दहावी बोर्ड परीक्षेचा जळकोट तालुक्याचा निकाल ९२.६४ टक्के लागला आहे. या गुणवंतांचा सत्कार बुधवारी करण्यात आला. शाळानिहाय निकाल : जिल्हा परिषद प्रशाला जळकोट ८०.७६ टक्के, गुरुदत्त विद्यालय जळकोट ९०, शांतमाता कन्या विद्यालय जळकोट ७२.२२, विकास विद्यालय अतनूर ९३.३३, ज्ञानविकास विद्यालय पाटोदा (बु.) १००, माध्यमिक आश्रमशाळा सुल्लाळी ९७, ज्ञानवर्धिनी विद्यालय मंगरुळ १००, संत नामदेव विद्यालय धामणगाव १००, संत तुकाराम विद्यालय जगळपूर ९६.६६, श्री संभाजी विद्यालय घोणसी ९५.१२, श्री धोंडूतात्या विद्यालय माळहिप्परगा ९२.७२, श्री समर्थ धोंडूतात्या विद्यालय कोळनूर ९२.५९, श्री समर्थ धोंडूतात्या विद्यालय कोळनूर ८७.०९, श्री शिवाजी विद्यालय लाळी (बु.) ९१, कै. एम.एन. पाटील विद्यालय बेळसांगवी ९२.८५, क्रांती विद्यालय केकतसिंदगी ९१.३०, माध्यमिक आश्रमशाळा शिवाजी नगर तांडा ९७.५८, रामकृष्ण पाटील विद्यालय सोनवळा १०० टक्के, ज्ञानेश्वर विद्यालय गुत्ती ९०.९०, उज्ज्वल ग्रा.वि. घोणसी ९०.९०, संत ज्ञानेश्वर विद्यालय सोनवळा ९०.४७, क्रांती विद्यालय तिरुका ८४.२१, महात्मा गांधी विद्यालय रावणकोळा ८८.८८, मराठवाडा विद्यालय चेरा ८०.६४, माध्यमिक आश्रमशाळा चिंचोली ९९.०९, संत गोविंद स्मारक विद्यालय वांजरवाडा ९३.९१, खाजा गरीब नवाज उर्दू शाळा १००, मातोश्री माध्यमिक विद्यालय करंजी ८८.८८ टक्के लागला आहे. गुरुदत्त विद्यालयाचा निकाल ९० टक्के...जळकोट येथील श्री गुरुदत्त विद्यालयाचा निकाल ९० टक्के लागला आहे. दिलीप धनगे प्रथम, महेश सोनटक्के द्वितीय, आरती थोंटे तृतीय आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक संस्थाध्यक्ष डॉ. सांगवीकर, प्राचार्य संपत शिंगाडे, प्रा. मरशिवणे, प्रा. धुळशेे, प्रा. पटवारी, प्रा. कांबळे, हांपले आदींनी केले. जळकोट येथील जिल्हा परिषद हायस्कूलचा निकाल ८१ टक्के लागला असून, शिवम कंगळे प्रथम, सुकेशनी सोनटक्के द्वितीय, आशिष धुळशेे तृतीय आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक मुख्याध्यापक टेकले, सुनीता डांगे, वाघमारे आदींनी केले.