शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
3
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
4
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
5
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
6
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
7
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
8
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
9
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
10
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
11
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
12
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
13
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
16
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
17
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
18
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
19
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
20
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...

सरसंघचालक घेणार व्यापमंचा फीडबॅक

By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST

रविवारी समिधात बैठक: चिंता वाढली

रविवारी समिधात बैठक: चिंता वाढली
शिवअनुराग पटैरया/राजेंद्र पाराशर
भोपाळ: सरसंघचालक मोहन भागवत दोन दिवसांच्या दौऱ्यावर शनिवारी येथे येणार असून व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळ्यासंदर्भात (व्यापमं)ते सविस्तर माहिती घेतील. विशेषत: मध्य प्रदेशात भाजपाची स्थिती आणि या घोटाळ्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालावर ते संघ पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत.
व्यापमं घोटाळ्यामुळे केवळ मध्य प्रदेशातच नाहीतर संपूर्ण देशात निर्माण झालेल्या प्रतिकूल वातावरणामुळे संघाची चिंता वाढली असून यातून लवकरात लवकर मुक्ती मिळविण्याची संघटनेची इच्छा आहे.
भाजपाच्या प्रतिमेवर याचा काय आणि किती परिणाम झाला हे जाणून घेण्यासाठी पक्षाने राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरही विचारमंथन सुरू केले आहे. अलीकडेच संघातर्फे राज्यात दोन प्रकारचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यापैकी एक सत्ता व संघटनेची जनतेच्या मनात असलेली प्रतिमा आणि दुसरा व्यापमं घोटाळा आणि त्याच्याशी संबंधित मृत्यूबाबत होता. हे सर्वेक्षण अद्याप पूर्ण झाले नसल्याचे सांगितले जाते.
सरसंघचालक शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस भोपाळमध्येच मुक्कामी असून या दोन मुद्यांवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशिवाय मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याशीही ते चर्चा करतील.
भागवत आणि संघ पदाधिकाऱ्यांसोबत रविवारी समिधामध्ये चौहान, प्रदेश भाजपाचे अध्यक्ष नंदकुमार सिंग चौहान आणि प्रदेश संघटन मंत्री अरविंद मेनन यांची समन्वय बैठक होणार आहे. या बैठकीत सरसंघचालक प्रामुख्याने व्यापमं घोटाळ्याच्या परिणामांचा आढावा घेणार असून त्यानंतरच ते कुठल्या निर्णयाप्रत पोहोचतील यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या बैठकीतच सत्ता आणि संघटनेतील नेत्यांचे भविष्य ठरेल.
प्रकाश झा व्यापमंवर चित्रपट काढणार?
सामाजिक मुद्यांवर चित्रपट निर्मिती करणारे प्रकाश झा यांनी व्यापमं घोटाळ्यावर चित्रपट काढण्याचे संकेत दिले आहेत. तत्पूर्वी हा संपूर्ण विषय जाणून घेण्याची त्यांची इच्छा आहे. हा विषय तरुण पिढीशी संबंधित आणि मध्य प्रदेशशिवाय संपूर्ण देशात चर्चेत असल्याने झा यांना तो महत्त्वाचा वाटतो. झा सध्या भोपाळ आणि आजूबाजूच्या परिसरात गंगाजल-२ या चित्रपटाचे चित्रिकरण करीत आहे. ते म्हणाले, एखाद्या विषयावर चित्रपट निर्मितीपूर्वी मी चार ते पाच वर्षे त्यावर सखोल विचार करतो. त्यानंतर चित्रपटाचे काम सुरू होते. व्यापमं घोटाळा समाजाशी निगडित असून त्याची सीबीआय चौकशीही होणार आहे. अनेक व्यावसायिक, राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांसह सर्व वर्गाचे लोक यात सामील असल्याने चित्रपट निर्मितीचा विचार होऊ शकतो.