शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पित्यालाच दूर सारणार?

By admin | Updated: January 7, 2017 04:44 IST

अखिलेश गटाने मात्र काँग्रेसशी समझोता करून आणि मुलायम गटाला दूर ठेवून निवडणुका लढवण्याची जोरदार तयारी चालवली आहे.

लखनऊ : समाजवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर शिवपाल यादव यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री व आपले पुतणे अखिलेश यादव यांची त्यांच्या घरी भेट घेऊन जुळवून घेण्याचे प्रयत्न शुक्रवारी सुरू केले असले तरी अखिलेश गटाने मात्र काँग्रेसशी समझोता करून आणि मुलायम गटाला दूर ठेवून निवडणुका लढवण्याची जोरदार तयारी चालवली आहे. नावे जाहीर झालेल्या उमेदवारांनी आता मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू करावा, लखनौमध्ये थांबू नये, अशा सूचना अखिलेश यांनी दिल्या आहेत.या भेटीबद्दल दोन्ही गटांनी बोलण्यास नकार दिला. मात्र मिळालेल्या माहितीनुसार आपणच पक्षाध्यक्ष राहू, उमेदवारांची निवडही आपण करू, अशा अटी अखिलेश यांनी घातल्या आहेत. त्या मान्य असतील, तरच दोन्ही गट एकत्र येतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र या दोन्ही अटी मुलायमसिंग व शिवपाल यांना मान्य नाहीत. शिवपाल हे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला तयार असले तरी मुलायमसिंग यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडावे, ही मागणीच त्यांच्या गटाला मान्य नाही. त्यामुळे संभाव्य ‘तडजोडीचे सूत्र’ म्हणून अमरसिंह यांना राजीनामा देण्यास सांगितले जाईल, अशी चर्चा आहे. आपल्यामागे संपूर्ण पक्ष आहे, असे निवडणूक आयोगाला पटवून देण्यासाठी अखिलेश गटाने पूर्ण तयारी केली आहे. मात्र अखिलेश गटाकडे २२९ पैकी २१२ विधानसभेचे तर ६८ पैकी ५६ विधान परिषदेचे सदस्य असून, २४ पैकी १६ खासदार आहेत आणि त्यांनी तशी शपथपत्रे दिली आहेत, अशी माहिती राम गोपाल यादव यांनी दिली. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपले म्हणणे पटवून देण्यासाठी ९ जानेवारीपर्यंत वेळ दिला आहे.रामगोपाल यांचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ धोरण‘सायकल’वरील दाव्यावरून मुुलायमसिंह यादव आणि अखिलेश पिता-पुत्रांत ऐन निवडणुकीच्या काळात संघर्ष निर्माण झाल्याने दोघांत समेट घडवून आणण्याचे जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यापार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे निष्ठावंत रामगोपाल यादव यांनी आता ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे, तसेच अखिलेश समर्थकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर न करण्याचाही त्यांनी निर्णय घेतला आहे. (वृत्तसंस्था)>अखिलेश-राहुल भेट होणारसमाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात युतीची मोठी शक्यता आहे. अखिलेश हे राहुल गांधी यांची ९ जानेवारी रोजी भेट घेण्याची अपेक्षा असून तेव्हा निश्चित निर्णय होईल. या चर्चेत प्रियंका गांधीही सहभागी होतील. अखिलेश यांचे पारडे जड झाल्याचे दिसताच सपा व काँग्रेस यांच्यात युतीची शक्यताही निर्माण झाली आहे.