ऑनलाइन लोकमत
त्रिपुरा, दि. १७ - घराच्या मागे खड्डा खणून पोटच्या मुलीला जिवंतपणे गाडण्याचा प्रयत्न करणा-या नराधम पित्याला पोलिसांनी अटक केली आहे. भारत- बांग्लादेश सीमेनजीक असलेल्या एका गावातील अबुल हुसैन याला त्याची मुलगी आवडत नसल्यानेच त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
पत्नी बाहेर गेली असताना हुसैन घराच्या मागच्या भागात एक खड्डा खणला आणि मुलीचे हात-पया बांधून तिला गाडण्याचा प्रयत्न केला. मात्र तेवढ्यात त्याची पत्नी परत आली व तो घरात परत आला. नव-याच्या कृत्याचा संशय आल्याने त्याच्या पत्नीने मुलीचा शोध घेतला असता तिला ती खड्ड्यात सापडली आणि शेजा-यांच्या मतदीने तिला वाचवले. त्या मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचे समजते.
याप्रकरणी हुसैनला अटक करण्यात आली असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.