शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘एनएसजी’साठीची घाई अनावश्यक !

By admin | Updated: June 26, 2016 02:17 IST

अणुपुरवठादार देशांच्या गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यासाठी केंद्र सरकारने केलेले प्रयत्न ही ‘अनावश्यक घाई’ होती आणि ‘चुकीच्या सल्ल्यावर’ ते करण्यात आले, असे मत प्रमुख वैज्ञानिक

हैदराबाद : अणुपुरवठादार देशांच्या गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यासाठी केंद्र सरकारने केलेले प्रयत्न ही ‘अनावश्यक घाई’ होती आणि ‘चुकीच्या सल्ल्यावर’ ते करण्यात आले, असे मत प्रमुख वैज्ञानिक आणि अणुऊर्जा आयोगाचे (एईसी) सदस्य एम. आर. श्रीनिवासन यांनी व्यक्त केले आहे.एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, याबाबत सरकारने अणुऊर्जा आयोगाकडून सल्ला घेतला असता तर आम्ही अशी घाई करू नका, असा सल्ला दिला असता. एईसी अणुऊर्जा विभाग ‘डीएई’च्या अखत्यारीत आहे. ‘एईसी’ देशात अणुऊर्जाविषयक घडामोडी पाहतो.श्रीनिवासन हे ‘एईसी’चे माजी प्रमुख आहेत. ते म्हणाले की, एनएसजी सदस्यत्वाने भारताच्या अणुव्यापारावर कोणताही परिणाम होत नाही, कारण भारताने अणुभट्ट्या आणि युरेनियमच्या पुरवठ्यासाठी अन्य देशांशी करार केलेलेच आहेत. असे असताना भारताने ‘एनएसजी’ सदस्यत्वाचा मोठा मुद्दा केला. ही केवळ ‘अनावश्यक’ बाब होती. २००८ साली मिळालेल्या सवलतीमुळे आम्ही पूर्वीच अणुसंपन्न देशांशी अणुव्यापार करण्यासाठी सक्षम झालो आहोत. आम्ही अणुभट्ट्यांसाठी पूर्वीच रशिया, फ्रान्स आणि अमेरिकेसोबत करार केले आहेत; शिवाय युरेनियमच्या पुरवठ्यासाठी कझाकिस्तान, कॅनडा, आॅस्ट्रेलिया यांच्याशी करार केला आहे. ‘एनएसजी’ची स्थापना १९७४ साली झाली. त्यात प्रवेशासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला ‘अनावश्यक’ होता.श्रीनिवासन यांना पद्मभूषण या प्रतिष्ठित नागरी किताबाने सन्मानित करण्यात आले आहे. ते म्हणाले की, एनएसजीचे सदस्यत्व न मिळाल्याने भारताच्या अणुकार्यक्रमावर प्रतिकूल परिणाम होणार नाही. भारताकडे अणुभट्ट्यांचे डिझाईन आणि निर्मिती, इंधनाचे उत्पादन, प्रक्रिया याबाबत स्वत:ची क्षमता आहे. (वृत्तसंस्था)भारताच्या प्रतिष्ठेला ‘धक्का’ व्यावहारिक विचार करता एनएसजीची सदस्यता न मिळाल्याने भारतावर काहीही परिणाम होणार नाही. आम्हाला पूर्वीच सवलत मिळाली आहे. महत्त्वाचे देश आणि युरेनियमचा पुरवठा करणाऱ्या देशांशी आम्ही पूर्वीपासूनच सहकार्य घेत आहोत. असे असताना अशी ‘फजिती’ करून घेण्याची मुळीच गरज नव्हती. दुर्दैवाने या घटनेमुळे भारताच्या प्रतिष्ठेला ‘धक्का’ बसला. सरकारने अणुऊर्जा आयोगाशी संपर्क साधला असता तर त्यांना असे प्रयत्न करू नका, असा सल्ला दिला असता. पण दुर्दैवाने आमच्याकडे हे प्रकरण आलेच नाही. ते परराष्ट्र मंत्रालयाचे प्रकरण बनले.