शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

कमी नुकसानभरपाईमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: March 31, 2016 03:26 IST

नैसर्गिक संकटाचा मार झेलत असताना मिळालेल्या कमी नुकसानभरपाईमुळेच काही शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग अवलंबावा लागला, हे वास्तव असून त्याबाबत चूक दुरुस्त करण्याची

नवी दिल्ली : नैसर्गिक संकटाचा मार झेलत असताना मिळालेल्या कमी नुकसानभरपाईमुळेच काही शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग अवलंबावा लागला, हे वास्तव असून त्याबाबत चूक दुरुस्त करण्याची गरज आहे, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला धारेवर धरले.आम्ही कोणत्याही सरकारविरुद्ध नाही. चांगले काम करीत असल्याचा दावा सरकार नेहमीच करीत आले आहे, मात्र शेतकरी आत्महत्या करीत आहेत, हे सर्वज्ञात आहे, असे एम.बी. लोकूर, एन.व्ही. रामण या न्यायमूर्तीद्वयांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. नैसर्गिक संकटाची झळ पोहोचलेल्या भागासाठी आर्थिक मदतीसंबंधी मार्गदर्शक तत्त्वांची तातडीने अंमलबजावणी करावी, असे सुचविणाऱ्या जनहित याचिकेवर खंडपीठाने सुनावणी केली. पिकांच्या नुकसानीबाबत आढावा घेताना मनमानी पद्धत अवलंबली जात नसल्याचा दावा करतानाच अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद यांनी संबंधित आरोप फेटाळले. पिकांच्या नुकसानीचा आढावा घेताना पटवारी आणि अन्य अधिकारी मनमानी पद्धत अवलंबत असल्याचा आरोप स्वराज अभियान या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)निवडणूक विश्लेषक आणि कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी आर्थिक मदतीबाबत केल्या जात असलेल्या भेदभावाकडे लक्ष वेधले.शेताला शेत लागून असलेल्या दोन भावांपैकी एकाला १६ हजार तर दुसऱ्याला केवळ १६० रुपये नुकसानभरपाई मिळाल्याचा दावा यादव यांनी केला. मोदी सरकारने अलीकडेच घोषणा केलेली ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ अशा परिस्थितीत सुसंगत ठरते काय? दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकेल काय, असा प्रश्नही खंडपीठाने मदतीसंबंधी चर्चेदरम्यान विचारला.