शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

शेतकऱ्यांना अनुदान, पीक विमा संरक्षण हवे

By admin | Updated: February 27, 2016 01:57 IST

देशातील वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सिंचनाची क्षमता वाढविण्याबरोबरच पीक विम्याचे संरक्षण देण्यासारखे उपाय पुरेसे नसून शेतकऱ्यांना कर्जमाफी व पुरेसे अनुदान देणे

नवी दिल्ली : देशातील वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सिंचनाची क्षमता वाढविण्याबरोबरच पीक विम्याचे संरक्षण देण्यासारखे उपाय पुरेसे नसून शेतकऱ्यांना कर्जमाफी व पुरेसे अनुदान देणे गरजेचे असल्याचे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे. देशातील बहुसंख्य भागात यंदा दुष्काळी स्थिती असून त्यामुळे भात, कापूस व इतर पिकांना फटका बसला आहे. त्यातच शेतीमालाला पुरेसे भाव नसल्याने बळीराजा अडचणीत आला आहे. देशातील निम्म्यापेक्षा अधिक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली असून यापूर्वीच्या सरकारांनी कर्जमाफी दिल्यानंतरही त्याच्यावरील आर्थिक संकटे कमी झालेली नाहीत. त्यामुळे गेल्या दशकात नापिकी व कर्जबाजारीपणामुळे लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्येचा टोकाचा मार्ग निवडल्याचे कृषी क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना अर्थसंकल्पात विकासदराचे लक्ष्य गाठताना अडचणीतील शेतकरी आणि दुर्बल घटकांना त्याचे फायदे करून देण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. शेतकऱ्यांना वाचवण्याचे मोठे आव्हान अर्थमंत्र्यांसमोर आहे. (लोकमत न्युज नेटवर्क)देशात २०१४ मध्ये ५,६५० शेतकरी आत्महत्यांची सरकारी दरबारी नोंद झाली. त्यातील अर्ध्याहून अधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या. मध्य प्रदेश, तेलंगण, छत्तीसगड व कर्नाटकातही मोठ्या संख्येने आत्महत्या झाल्या. शेतकऱ्यांच्या मागण्याहवामानाचा अचूक अंदाज वर्तवावा खतांवरील अनुदान वाढवावेसर्व पिकांना राज्य सरकार पुरस्कृत विमा योजना लागू करावीदाव्यांचा निपटारा लवकर व्हावाकेंद्र सरकारने गेल्या महिन्यात पिकांच्या नुकसानीवरील भरपाईसाठी महत्त्वाकांक्षी विमा योजना जाहीर केली आहे. त्यात शेतकऱ्यांना अत्यल्प हप्ता भरावा लागेल, असे सरकारने आश्वासन दिले आहे.विम्याचे दावे लवकर निकाली निघण्यासाठी सरकारला प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल, असे ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायरोन्मेंट’च्या संचालक सुनिता नारायण यांनी सांगितले.