शिंगणापुरात भाविकांच्या गर्दीचा निचांक अपेक्षा ठरल्या फोल : स्थानिक व्यावसायिकांत नाराजी
By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST
नेवासा(अहमदनगर) : कुंभमेळ्यातील पहिल्या शाहीस्नानाची पर्वणी पार पडल्यानंतर शिंगणापूरला भाविकांच्या गर्दीचा उच्चांक होईल अशी येथील व्यावसायिकांसह देवस्थान प्रशासनाची अपेक्षा होती. मात्र मागील १२ वर्षांच्या तुलनेतील कुंभमेळ्याच्या गर्दीच्या भाविकांच्या एक चतुर्थांशदेखील गर्दी न झाल्याने सर्वांच्या अपेक्षेवर पाणी फिरले आहे.
शिंगणापुरात भाविकांच्या गर्दीचा निचांक अपेक्षा ठरल्या फोल : स्थानिक व्यावसायिकांत नाराजी
नेवासा(अहमदनगर) : कुंभमेळ्यातील पहिल्या शाहीस्नानाची पर्वणी पार पडल्यानंतर शिंगणापूरला भाविकांच्या गर्दीचा उच्चांक होईल अशी येथील व्यावसायिकांसह देवस्थान प्रशासनाची अपेक्षा होती. मात्र मागील १२ वर्षांच्या तुलनेतील कुंभमेळ्याच्या गर्दीच्या भाविकांच्या एक चतुर्थांशदेखील गर्दी न झाल्याने सर्वांच्या अपेक्षेवर पाणी फिरले आहे. शनिवारी येथे दिवसभरात किमान दीड ते दोन लाख भाविकांनी शनिदेवाच्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतले. मात्र या तुलनेत रविवारी भाविकांचा आकडा १० हजाराच्या पुढेही जाऊ शकला नाही. नारळी पौर्णिमेचा सण असल्याने कोकण आणि मुंबईच्या भाविकांना शिंगणापूरला यायला वेळच मिळाला नाही. त्यामुळे गर्दी खूपच कमी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिर्डीला दहा ते पंधरा किलोमीटरवर पार्किंग ठेवल्याने भाविकांनी शिंगणापूरला येणे टाळल्याचाही अंदाज यानिमित्ताने येथे व्यक्त केला जात आहे. शिंगणापूरला गर्दी कमी असल्याने शनिवारी वाहनांना थेट मंदिर परिसरात प्रवेश देण्यात आला होता. मात्र रविवारी काही प्रमाणात ही वाहने अडविण्यात आल्याने भाविकांच्या उत्साहावर विरजण पडले. (तालुका प्रतिनिधी)