शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

मोदींच्या ताफ्याच्या मार्गावर फेकली फुलदाणी

By admin | Updated: February 4, 2016 03:09 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुरक्षा ताफा नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉकजवळून जाण्यास काही क्षण असताना एका २० वर्षीय महिलेने सुरक्षा भेदत या मार्गावर फुलदाणी फेकून मारल्याची घटना बुधवारी घडली.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुरक्षा ताफा नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉकजवळून जाण्यास काही क्षण असताना एका २० वर्षीय महिलेने सुरक्षा भेदत या मार्गावर फुलदाणी फेकून मारल्याची घटना बुधवारी घडली. नीना रावल असे या महिलेचे नाव असून ती उत्तर प्रदेशातील साहिबाबादची रहिवासी आहे.पंतप्रधानांचा ताफा जाणार असल्याने पोलिसांनी या मार्गावर आधीच मोर्चा सांभाळला होता. दुपारी २ वाजून १० मिनिटांनी ही घटना घडली. यादरम्यान ही महिला समोर आली. तेव्हा तिची पोलिसांशी बाचाबाचीही झाली. पोलीस उपायुक्त जतीन नरवाल यांनी सांगितले की, पंतप्रधानांचा ताफा जाणार होता म्हणून विजय चौकनजीक नागरिकांना थांबवून घेण्यात आले होते. या नागरिकांतच ही महिला उभी होती.

(लोकमत न्यूज नेटवर्क)

मोदींच्या गाड्यांचा ताफा येण्याच्या काही सेकंदापूर्वी तिने बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिला रोखताच, तिने रस्त्याच्या कडेला विक्रीसाठी असलेली फुलदाणी उचलली आणि गाड्यांच्या ताफ्याच्या दिशेने फेकून मारली. सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये यामुळे एकच गोंधळ उडाला. सदर महिलेला तात्काळ घटनास्थळापासून दूर नेण्यात आले. यानंतर संसद मार्ग पोलीस ठाण्यात तिला ताब्यात घेण्यात आले. पोलीस तिची कसून चौकशी करीत आहेत.