शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा अधिवेशनाला मुदतवाढ म्हणजे हुकूमशाही

By admin | Updated: May 9, 2015 05:31 IST

लोकसभा अधिवेशनाचा कार्यकाळ आणखी तीन दिवसांसाठी वाढविण्याच्या निर्णयाचा जोरदार विरोध करीत समस्त विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला

नवी दिल्ली : लोकसभा अधिवेशनाचा कार्यकाळ आणखी तीन दिवसांसाठी वाढविण्याच्या निर्णयाचा जोरदार विरोध करीत समस्त विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. हा निर्णय ‘हुकूमशाही’ प्रवृत्तीचा असल्याचे विरोधक म्हणाले, तर संसदेऐवजी मीडियातून याबद्दलची माहिती मिळाल्याबद्दल सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला.या आधीच्या परंपरेप्रमाणेच हा निर्णय घेण्यात आला; परंतु राज्यसभेची बैठक गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्याने आणि संसदीय कामकाजमंत्री एम. वेंकय्या नायडूंसह अन्य अनेक मंत्री राज्यसभेत व्यग्र असल्याकारणाने काही पक्षांच्या नेत्यांना हा निर्णय कळविता आला नाही, अशी सारवासारव करीत सरकारने विरोधकांची टीका फेटाळली. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या आघाडीच्या सदस्यांनी लोकसभा अधिवेशनाची मुदत वाढविण्याच्या निर्णयाला जोरदार विरोध केला. या पक्षांच्या सदस्यांसोबतच अन्य पक्षांचे सदस्यही हौदात गोळा झाले आणि सरकारविरोधी घोषणा देऊ लागले. या गदारोळामुळे कामकाज तीनदा तहकूब करण्यात आले. ‘तानाशाही नही चलेगी’ आणि ‘मोदी सरकार जबाब दो’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते. निर्णय घेताना आपल्याशी संपर्क साधला गेला नाही, असा विरोधकांचा आक्षेप होता.लोकसभा अधिवेशनाची मुदत तीन दिवसांसाठी वाढविण्याच्या सरकारच्या निर्णयाला कामकाज सल्लागार कमिटीने मंजुरी दिल्यानंतर; लोकसभेची बैठक १३ मेपर्यंत वाढविण्यात आल्याचे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी जाहीर केले आणि सभागृहात गदारोळ सुरू झाला. शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करण्याची अनुमती महाजन यांनी विरोधकांना दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)