शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

महागड्या मोबाईलपायी १३ वर्षांची मुलगी गेली वेश्याव्यवसायात

By admin | Updated: May 26, 2015 12:17 IST

महागड्या मोबाईल व अन्य उपकरणांची हौस पूर्ण करण्यासाठी गुजरातमधील बडोदा येथील १३ वर्षाची मुलगी वेश्याव्यवसायात गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत

बडोदा, दि. २६ - महागड्या मोबाईल व अन्य उपकरणांची हौस पूर्ण करण्यासाठी गुजरातमधील बडोदा येथील १३ वर्षाची मुलगी वेश्याव्यवसायात गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या आईला या प्रकाराची माहिती मुलगी गर्भवती झाल्यानंतर समजली. सध्या या मुलीवर समुपदेशन सुरु आहे.

बडोद्यातील सुभानपूरा येथे एका महिलेचे ग्रॉसरी शॉप असून या महिलेला १३ वर्षांची मुलगी आहे. महिलेच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. या महिलेच्या १३ वर्षाच्या मुलीला महागड्या उपकरणांचे वेड लागले. मैत्रिणींकडे असलेले महागडे मोबाईल व अन्य उपकरणं आपल्याकडेही असावीत असे तिला वाटत होते. पण कुटुंबाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याने तिच्या आईला ही हौस पूर्ण करणे शक्य नव्हते. ही हौस भागवण्यासाठी त्या अल्पवयीन मुलीने चक्क वेश्याव्यवसायात जाण्याचा निर्णय घेतला. मुलीची आई दिवसभर दुकानात असल्याने तिच्या घरी कोणीही नसते. याचाच फायदा घेत त्या मुलीने ग्राहकांना थेट घरी बोलवायला सुरुवात केली. यासाठी तिने एक मोबाईल क्रमांकही मिळवला व हा नंबर तिच्या आईकडेही नव्हता. काही दिवसांपूर्वी मुलगी गर्भवती असल्याचे त्या महिलेला समजले व त्यांना धक्काच बसला. त्यांनी मुलीला जाब विचारल्यावर हा सगळा प्रकार उघड झाला. सध्या मुलीचे समुपदेशन सुरु असून तिची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु आहे.