शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

यूपीत अखिलेश सरकारचा विस्तार

By admin | Updated: September 27, 2016 01:41 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सोमवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. पंधरा दिवसांपूर्वी राजीनामा दिलेले वादग्रस्त खाणमंत्री गायत्रीप्रसाद प्रजापती यांच्यासह ४ जणांचा

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सोमवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. पंधरा दिवसांपूर्वी राजीनामा दिलेले वादग्रस्त खाणमंत्री गायत्रीप्रसाद प्रजापती यांच्यासह ४ जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला असून, ६ राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी पदोन्नती देण्यात आली आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीचा अखिलेश सरकारचा हा अखेरचा मंत्रिमंडळ विस्तार असू शकतो. राज्यपाल राम नाईक यांनी प्रजापती, मनोज पांडे, शिवकांत ओझा आणि जियादुद्दीन रिझवी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दोन आठवड्यांपूर्वी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आलेल्या प्रजापती यांचा पुन्हा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्याला एका सामाजिक कार्यकर्त्याने आव्हान दिले होते. यापूर्वीच्या विस्तारातच जियादुद्दीन रिझवी यांची वर्णी लागली होती. तथापि, परदेशात असल्यामुळे तेव्हा त्यांना शपथ घेता आली नव्हती. अखिलेश यादव सरकार २०१२ मध्ये सत्तेत आले होते, तेव्हापासूनचा हा आठवा विस्तार आहे. या विस्तारासह उत्तर प्रदेश मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ६० झाली आहे. प्रजापती यांच्यासोबत मंत्रिमंडळातून हकालपट्टी झालेले राजकिशोर सिंह यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री रियाझ अहमद, यासर शाह, रविदास मेहरोत्रा, तसेच राज्यमंत्री अभिषेक मिश्रा, नरेंद्र वर्मा आणि शंखलाल माझी यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. अखिलेश मंत्रिमंडळात आता ३२ कॅबिनेट मंत्री, नऊ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि १९ राज्यमंत्री आहेत. (वृत्तसंस्था)नेमके काय झाले होते?विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाची प्रतिमा स्वच्छ करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून अखिलेश यांनी दोन महिन्यांपूर्वी प्रजापती यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ केले होते. त्यांच्या या पावलामुळे सपात मोठा राजकीय भूकंप झाला होता. सपाप्रमुख मुलायमसिंह यादव यांनी पक्षातील संकट दूर करण्यासाठी हस्तक्षेप केल्यानंतर प्रजापती यांच्या पुनर्प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. शपथविधी सोहळ्याच्या ४८ तास आधी सामाजिक कार्यकर्त्याने राज्यपालांना अर्ज देऊन प्रजापती यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यास आक्षेप घेतला होता.