शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक तीन महिन्याला केंद्र देणार कराचा वाटा, अनेक राज्ये अडचणीत!, पद्धतीत बदल, निधीच्या चणचणीची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:58 IST

केंद्रीय करांमधील राज्यांचा वाटा त्यांना देण्याच्या पद्धतीत केंद्र सरकारने बदल केला असून आता राज्यांना ही रक्कम दरमहा न देता दर तिमाहीला देण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय करांमधील राज्यांचा वाटा त्यांना देण्याच्या पद्धतीत केंद्र सरकारने बदल केला असून आता राज्यांना ही रक्कम दरमहा न देता दर तिमाहीला देण्यात येणार आहे. आर्थिक स्थिती तोळामासा असलेल्या अनेक राज्यांना यामुळे निधीची चणचण भासण्याची धास्ती निर्माण झाली आहे.दि. १६ आॅगस्ट रोजी केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहून असे कळविले की, केंद्रीय करांमधील वाट्याची रक्कम येत्या मार्चअखेरपर्यंत प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला दिली जाईल. त्यानंतर ही रक्कम प्रत्येक तिमाहीला दिली जाईल.सध्याच्या व्यवस्थेनुसार केंद्र सरकार केंद्रीय करांच्या वसुलीतून जमा होणाºया रकमेपैकी ४२ टक्के रक्कम प्रत्येक महिन्याच्या एकतारखेला राज्यांना देते. त्यामुळे राज्यांना कर्मचाºयांचे पगार व पेन्शन देणे, प्रशासकीय कर्च करणे व कर्जांवरील व्याज वेळीच चुकती करणे सुलभ होते.या पद्धतीत बदल करण्याचे कारण विषद करताना केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, नवे वित्तीय सुरु झाले की, सुरुवातीचे काही महिने करांची वसुली फारशी होत नाही. त्यामुळे राज्यांना द्यायची रक्कम भागविण्यासाठी केंद्र सरकारला अनेक वेळा उधार उसनवारी करावी लागतअसे. त्यामुळे या पद्धतीत थोडा बदल केल्याने केंद्राला थोडा अवधी मिळेल व नव्या ‘जीएसटी’ व्यवस्थेत करवसुली कशी व किती होते याचा नेमका अंदाजही घेता येऊ शकेल.हा अधिकारी म्हणाला की, ‘जीएसटी’ची नवी पद्धत लागू झाल्याने सुरुवातीचे काही महिने अपेक्षेएवढा महसूल मिळेल याविषयी अनिश्चितता आहे. त्यामुळे राज्यांना त्यांच्या वाट्याची रक्कम चुकती करण्याच्या वेळापत्रकात थोडा बदल केला गेला आहे. परंतु या बदलामुळे खास करून गेल्या काही वर्षात आर्थिक शिस्त न पाळल्याने ज्या राज्यांची आर्थिक स्थिती डामाडौल झाली आहे अशा राज्यांमध्ये चिंतेची भावना निर्माण झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार सन २०१५ पासून राज्यांच्या सकल वित्तीय तुटीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अनेक राज्यांची स्थिती हातावरचे पोट असल्यासारखी आहे.केंद्रीय करांमधील वाट्याची रक्कम अशा प्रकारे विलंबाने देण्याची नवी पद्धत अन्यायकारक असल्याची अनेक राज्यांची भावना आहे व तेलंगण व पश्चिम बंगाल या दोन राज्यांनी तर केंद्र सरकारला पत्र लिहून निषेधही नोंदविला आहे. प. बंगालचे वित्तमंत्री अमित मित्रा यांनी केंद्राला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, दर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या तिजोरीवर सर्वात मोठा भार असतो. केंद्राकडून मिळणाºया पैशांमुळे तो काही प्रमाणात हलका होतो. आता ज्या महिन्यात केंद्राकडून रक्कम मिळणार नाही त्या महिन्याच्या सुरुवातीचे खर्च भागविण्यासाठ राज्यांना पैसे उसने घ्यावे लागतील किंवा ‘ओव्हरड्राफ्ट’ घ्यावा लाहेल.राज्यांचा वाटा १० टक्के वाढला१४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशी लागू केल्यानंतर केंद्रीय करांमधील राज्यांचा वाटा १० टक्क्यांनी वाढला आहे. पूर्वी एकूण करवसुलीच्या ३२ टक्के रक्कम केंद्र राज्यांना देत असे. आता ४२ टक्के देते. हे प्रमाण राज्याचा भौगोलिक आकार, लोकसंख्या व स्वत:ची उत्पन्नाची साधने यावर ठरते.

टॅग्स :TaxकरGovernmentसरकार