शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अविश्वासानंतरही बीडीओ रूजू

By admin | Updated: February 22, 2016 23:56 IST

जळगाव- गटविकास अधिकारी (बीडीओ) डॉ.सोनिया नाकाडे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव सर्वानुमते पं.स.च्या पदाधिकारी व सदस्यांनी आणला. तरीदेखील नाकाडे दीर्घकालीन सु˜ीनंतर सोमवारी रूजू झाल्या. जि.प. प्रशासनाने सदस्यांच्या निर्णयाकडे दुर्लक्ष केले. अपमान केला म्हणून आता विभागीय आयुक्त यांना या प्रकाराची माहिती दिली जाईल, असे पं.स.च्या सभापती हिराबाई मोरे, उपसभापती सिमा पाटील, सदस्य विजय नारखेडे व इतरांनी म्हटले आहे.

जळगाव- गटविकास अधिकारी (बीडीओ) डॉ.सोनिया नाकाडे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव सर्वानुमते पं.स.च्या पदाधिकारी व सदस्यांनी आणला. तरीदेखील नाकाडे दीर्घकालीन सु˜ीनंतर सोमवारी रूजू झाल्या. जि.प. प्रशासनाने सदस्यांच्या निर्णयाकडे दुर्लक्ष केले. अपमान केला म्हणून आता विभागीय आयुक्त यांना या प्रकाराची माहिती दिली जाईल, असे पं.स.च्या सभापती हिराबाई मोरे, उपसभापती सिमा पाटील, सदस्य विजय नारखेडे व इतरांनी म्हटले आहे.
बीडीओ नाकाडे या मनरेग व इतर कामांच्या संदर्भात सदस्यांना विश्वासात घेत नाहीत म्हणून सदस्यांनी बीडीओंवर अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्याची प्रत जि.प.ला टपालाद्वारे दिली.

प्रत सोमवारी जि.प.त आली
अविश्वास प्रस्ताव व बीडीओंच्या तक्रारींबाबतची प्रत सोमवारी दुपारी जि.प.च्या सामान्य प्रशासन विभागाला मिळाली, असा खुलासा या विभागाने केला.

बीडीओंना मुदतवाढ
बीडीओ नाकाडे या प्रशिक्षणार्थी म्हणून पं.स.मध्ये जून २०१५ मध्ये रूजू झाल्या. त्यांचा कार्यकाळ १२ फेब्रुवारी २०१६ पर्यंत होता. आता पुढील आदेश येईपर्यंत बीडीओंना या पदावर कायम ठेवावे, असे आदेश शासनातर्फे अलीकडेच जि.प.ला प्राप्त झाले आहेत, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातर्फे मिळाली.

कार्यमुक्त करणे अशक्य
बीडीओंविरोधात सदस्य अविश्वास प्रस्ताव आणू शकतात की नाही याचा निकष किंवा नियम नसला तरी असा प्रस्ताव आणला तरी त्याची दखल शासन घेत नाही. यामुळे बीडीओ नाकाडे यांना अविश्वासाच्या कारणामुळे कार्यमुक्त करणे अशक्य असल्याचे स्पष्टीकरण सामान्य प्रशासन विभागाने दिले आहे.