शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सम-विषम योजना दिल्लीत पुन्हा सुरू होणार

By admin | Updated: January 17, 2016 02:05 IST

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीचे सरकार राजधानी दिल्लीत पुन्हा सम-विषम योजना सुरू करण्याचा गांभीर्याने विचार करीत असून पुढील महिन्यात

- शीलेश शर्मा, नवी दिल्लीमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीचे सरकार राजधानी दिल्लीत पुन्हा सम-विषम योजना सुरू करण्याचा गांभीर्याने विचार करीत असून पुढील महिन्यात यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल.उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १ ते १५ जानेवारी या कालावधीत राबविण्यात आलेल्या सम-विषम योजनेला दिल्लीकर आणि सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे केजरीवाल यांचा उत्साह वाढला आहे. या काळात प्रदूषणाचा स्तर भलेही कमी झाला नसेल पण दिल्लीच्या रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक जामपासून मात्र येथील लोकांचा मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेला मिळणाऱ्या भरघोस पाठिंब्यामागे हेच मुख्य कारण आहे. निम्म्यावर लोकांचा पाठिंबाताज्या सर्वेक्षणानुसार दिल्लीतील ५४ टक्के लोकांनी योजनेला पाठिंबा देताना त्याची प्रशंसा केली आहे. तर २१ टक्के नागरिकांनी सम-विषमला विरोध केला आहे. २५ टक्के लोकांनी कुठलेही मत व्यक्त केलेले नाही. दुसरीकडे प्रदूषणात झालेल्या घटाबद्दल वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. हिवाळा नसता तर या योजनेचे ठोस परिणाम समोर आले असते, असा दावा पर्यावरण विशेषज्ञ सुनीता नारायण यांनी केला होता तर प्रदूषण कमी होण्याऐवजी आणखी वाढले असल्याचा युक्तिवाद अनेक संस्थांनी केला आहे. सम-विषय योजनेमुळे दिल्लीत पेट्रोल, डिझेलच्या वापराचे प्रमाण कमी झाले असल्याचे अन्य एका सर्वेक्षणात सांगण्यात आले. एका पेट्रोल पंपावर दररोज तीन टॅँकर विक्री होत होती. सम-विषममुळे ती दोन टँकरवर आली आहे. एका टँकरमध्ये २० हजार लिटर पेट्रोल असते आणि दिल्लीत हजारो पेट्रोल पंप आहेत. तेव्हा दररोज किती पेट्रोलची बचत होत असेल याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. वाया जाणारअया इंधनाचे प्रमाणही कमी झाले आहे.