उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम
By admin | Updated: May 8, 2014 21:08 IST
नाशिक : बॅँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत महाबॅँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत शेती व्यवसायावर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होत आहे.
उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम
नाशिक : बॅँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत महाबॅँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत शेती व्यवसायावर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होत आहे.सदर प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये शेडनेड फार्मिंग व्यवस्थापन, आधुनिक फुलशेती, आधुनिक शेती व्यवस्थापन, शेतीचे आर्थिक व्यवस्थापन, बाजार व्यवस्थापन, शासनाच्या विविध कर्ज व अनुदान योजना, कृषितज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रत्यक्ष प्रकल्पांना भेट, व्यवसाय करणार्या शेतकर्याचे मार्गदर्शन, चित्रफितीद्वारे मार्गदर्शन, प्रकल्प अहवाल मार्गदर्शन, आदि विषयांवर थेअरी, प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त युवकांनी, शेतकर्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. सदर प्रशिक्षणामध्ये निवास, जेवण व प्रशिक्षण विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी महाबॅँक आरसेटी द्वारा बॅँक ऑफ महाराष्ट्र, तिसरा मजला, नेहरू गार्डनजवळ, शालिमार येथे संपर्क साधावा.