शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी ’इंग्लिश विंग्लिश’

By admin | Updated: September 24, 2014 04:39 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांचे शिक्षण घेण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढत चालेले आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांचे शिक्षण घेण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढत चालेले आहे. त्यात विद्यापीठाने अनेक परदेशी विद्यापीठांशी करार केले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना इंग्रजी भाषेचे धडे देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. परिणामी विद्यापीठातील अधिकारीच नाही तर शिक्षकेतर कर्मचारीसुध्दा अस्खलित इंग्रजीमध्ये संवाद साधू शाकणार आहेत.शैक्षणिक क्षेत्रातील एकूण कामगिरीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा देशात पाचवा आणि महाराष्ट्रात पहिला क्रमांक लागतो. तसेच जागतिक स्तरावर इंग्रजीभाषात संवादासाठी वापरली जाते. परदेशी विद्यार्थी व अधिकाऱ्यांशी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सहज संवाद साधता यावा, यासाठी विद्यापीठातर्फे हे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला आहे. सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत कर्मचाऱ्यांना हे धडे देण्यात येत आहेत़ विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ.विजय खरे म्हणाले, विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या परदेशी विद्यार्थ्यांसाठीच केंद्रातर्फे इंग्रजी भाषेतील संवाद कौशल्यासाठी प्रशिक्षण वर्ग चालविला जात होता. आता विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीसुध्दा आठ आठवड्यांचा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षण वर्गासाठी प्रवेश घेतला असून त्यात सहाय्यक उपकुलसचिव आणि लिपीक यांचा समावेश आहे.विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड म्हणाले, इंग्रजी भाषा अवगत असणे ही काळाजी गरज आहे.