पाटोदा : एकीकडे दुष्काळ व दुसरीकडे त्यावर मात करणारेही अनेक हात आहेत. अशीच मात येथील तरु ण भावराव नाईकवाडे यांनी करून प्लास्टिक टाकी विक्र ीतून रोजगार उपलब्ध केला आहे. दिवसाकाठी कमीत कमी हजार रु पये टाकी विक्र ीतून मिळवून दुष्काळाशी लढा देत आहेत.सध्या येवला तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे नागरिकांसह जनावरांचे पाण्यासाठी हाल होत आहेत; परंतु आपल्याकडे उपलब्ध पाणी साठवून ठेवण्यासाठी आवश्यक असणार्?या प्लास्टिकच्या टाक्या खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत. दिवसभरात १०/२० च्या वर टाक्यांची विक्र ी होत असल्याचे नाईकवाडे यांनी सांगितले. पाटोद्यात भावराव नाईकवाडे या तरु णाने टाकी विक्र ी साठी आपला व्यवसाय थाटला आहे. २० लिटरपासून ते २००० लिटरपर्यंतच्या टाक्या विक्र ीसाठी आल्या आहेत. एवढेच नव्हे तर गतवर्षीपेक्षा यावर्षी २० टक्क्यांनी टाक्यांच्या किमती वाढल्याने चांगला रोजगार मिळू लागला आहे. तरु णानीही कोणत्याही कामाची लाज न बाळगता उद्योग व्यवसायातून आपली प्रगती साधावी असेही भावराव नाईकवाडे यांनी सांगितले आहे. (१० पाटोदा १)
प्लास्टीक टाक्या विक्र ीतून मिळाला रोजगार
By admin | Updated: March 12, 2016 00:20 IST