शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

आपमध्ये 'राडा', यादव, भूषण यांची हकालपट्टी

By admin | Updated: March 28, 2015 13:11 IST

योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांची आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आली असून आपल्याला लाथा- बुक्क्यांनी मारहाण झाल्याचा आरोप यादव यांनी केला.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला आज युद्धभूमीचे स्वरूप आले होते. प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांच्यासह चार जणांची 'आप' राष्ट्रीय कार्यकारीणीतून हकालपट्टी करण्यात आली असून बैठकीत आपल्याला व कार्यकर्त्यांना लाथा- बुक्क्यांनी तुडवून मारहाण करण्यात आल्याचा आरोप प्रशांत भूषण यांनी केला आहे. तर आजच्या बैठकीत 'लोकशाहीची हत्या झाली' असा आरोप योगेंद्र यादव यांनी केला. 
शनिवारी पार पडलेल्या बैठकीची सुरूवातच वादळी झाली. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे बैठकीत आगमन झाले खरे, मात्र योगेंद्र यादव आणि पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना बैठकीसाठी आत प्रवेशच दिला गेला नाही. यामुळे नाराज झालेले यादव हे धरणे आंदोलनास बसले, अखेर थोड्या वेळाने त्यांना आत जाण्याची परवानगी देण्यात आली. बैठकत केजरीवाल यांनी सुमारे ४० मिनिटे भाषण केले आणि ते निघून गेले.  त्यानंतर मनिष सिसोदिया यांनी प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, प्रा. आनंद कुमार आणि अजित झा या चौघांना बाहेर काढण्याचा प्रस्ताव मांडला. तो पास होताच या चौघांचीही पक्षाच्या सर्व पदांवरून हकालपट्टी करण्यात आली. मात्र यावेळी आपण आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला असता आपली कुठलीच गोष्ट ऐकून घेतली गेली नाही, असे यादव यांनी सांगितले. ही लोकशाहीची हत्या असल्याचेही ते म्हणाले. तर आपल्याला व कार्यकर्त्यांनातेथे उपस्थित असलेल्या बाऊन्सर्सनी मारहाण केली आणि बाहेर काढले, असा आरोप भूषण यांनी केला
दिल्लीत प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या आम आदमी पक्षात नंतरच्या जेमतेम महिनाभरातच गृहयुद्धाचा भडका उडाला असून आजच्या या घटनेमुळे पक्षाच्या अब्रूची लक्तरे अक्षरश: वेशीवर टांगली गेली आहेत. या सर्व प्रकारामुळे 'आप'चे कार्यकर्ते आणि ज्या जनतेने एवढ्या विश्वासाने पक्षाला निवडणुकीत पुन्हा निवडून दिले त्या सर्वांच्या पक्षावरील विश्वासाला तडा गेला आहे.