नवी दिल्ली : ऑनलाईनवर यापुढे कदाचित स्वस्त इलेक्ट्रॉनिक्स उपकरणो वा वस्तू मिळण्याची शक्यता कमी आहे. वस्तुस्थिती अशी की इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी त्यांच्या किरकोळ (रिटेलर्स) विक्रेत्यांना आपली उत्पादने ऑनलाईन साईटस्वर उपलब्ध करून देऊ नका, असे सांगितले आहे.
ऑनलाईन साईटद्वारे कॅमेरे, स्मार्टफोन आणि म्युङिाक अॅक्सेसरीजवर मिळणारे डिस्काऊंट कमी होऊ शकते, कारण कॅनन, लिनोवो, सॅमसंग, पॅनासॉनिक व सोनी यासारख्या बडय़ा कंपन्यांच्या स्थानिक विक्रेत्यांनी या कंपन्यांवर दडपण आणले आहे. स्थानिक विक्रेत्यांनी कंपनीने दिलेले कोणतेही उत्पादन ऑनलाईन उपलब्ध करून देऊ नये, असे कंपन्यांनी त्यांना स्पष्ट केले आहे. या परिस्थितीत स्थानिक विक्रेत्यांना दिला जाणारा स्टॉक कमी होऊ शकतो.
किरकोळ विक्रेत्याने कंपनीचे उत्पादन ऑनलाईन उपलब्ध करून दिल्यास व्यापार कराराचे उल्लंघन होते. कारण कंपनी विक्रेत्याला (ऑफलाईन) कंपनीचे उत्पादन विशिष्ट परिसरात विकायची परवानगी देत असते; परंतु ऑनलाईन व्यवहार झाल्यास या कराराचे उल्लंघन होते, असे कंपन्यांचे म्हणणो आहे.
या संदर्भात लिनोवोचे व्यवस्थापकीय संचालक अमर बाबू यांनी सांगितले की, व्यापार कराराचे पालन केले गेले पाहिजे.
करारात व्यापारी कंपनीचे उत्पादन कोठे विकू शकतो व कुठे नाही, हे स्पष्ट केलेले असते. जेव्हा उत्पादन ऑनलाईन उपलब्ध केले जाते तेव्हा कराराचे उल्लंघन होते. आमची कंपनी ऑनलाईन बाजारपेठेचाही चांगला उपयोग करता यावा यासाठी प्रसिद्ध ऑनलाईन रिटेल साईटशी बोलणी करीत आहे, असेही अमर बाबू म्हणाले.