शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये निवडणुका लवकर होणार?

By admin | Updated: December 22, 2016 00:57 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जाहीर सभेत भ्रष्टाचाराच्या केलेल्या

अहमदाबाद : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जाहीर सभेत भ्रष्टाचाराच्या केलेल्या जोरदार आरोपांमुळे गांधींनी मोदींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचे सगळ््या देशात चित्र निर्माण झाले असले तरी या जाहीरसभेचा सूक्ष्म तपशील पाहता गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका लवकर होण्याचे स्पष्ट संकेत त्यातून मिळतात. गुजरातमधील मेहसानाची निवड जाहीरसभेसाठी राहुल गांधी यांनी करणे, गुजरातेत पाटीदार, दलित, मुस्लिम समाजावरील अत्याचारांचा उल्लेख करणे नरेंद्र मोदी यांच्यावर आधीच केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा पुनरुच्चार हा तो सूक्ष्म तपशील आहे. मोदी यांनी ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना स्वत:ची प्रतिमा भ्रष्टाचारापासून मुक्त असलेला राजकीय नेता अशी केली होती व लोकांनाही ती पसंत पडली होती. त्या आधारानेच ते २०१४ मध्ये पंतप्रधान बनले होते.राजकीय निरीक्षकांचे म्हणणे असे आहे की राहुल गांधी यांनी २०१७ मध्ये गुजरात विधानसभेच्या होणाऱ्या निवडणुकांसाठी काँग्रेसच्या प्रचार मोहिमेला या जाहीरसभेने जणू सुरवातच केली आहे. आणि त्यासाठी त्यांनी उत्तर गुजरातमधील मेहसाना हा मोदी यांचा जिल्हा निवडला. गुजरात राज्यात मेहसाना जिल्ह्याचे विशेष राजकीय स्थान आहे म्हणूनच काँग्रेसने त्याची काळजीपूर्वक निवड केली. गुजरातला जर भाजपची प्रयोगशाळा व बालेकिल्ला मानले तर मेहसाना हा भाजपचा राज्यातील मोठा गड आहे. १९८४ मध्ये काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवला असताना राज्यात भाजपने जिंकलेल्या अवघ्या दोन जागांमध्ये मेहसानाची एक होती.तथापि, २०१५ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने मेहसाना जिल्हा व तालुका पंचायत तसेच मेहसाना नगरपालिका निवडणुका जिंकल्या. पाटीदार समाजाने राखीव जागांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू मेहसानाच होते. याच आंदोलनामुळे आनंदीबेन पटेल यांना राजीनामा द्यावा लागून मुख्यमंत्रीपद विजय रुपानी यांच्याकडे आले. २०१४ मध्ये निवडणुकीनंतर तसेच मोदी सरकारने चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर मेहसानातील बुधवारची राहुल गांधी यांची ही पहिलीच जाहीर सभा होती. यासभेपूर्वी राहुल यांनी उन्झा येथील उमिया माता मंदिरालाभेट दिली. पाटीदार समाजात या देवीचे स्थान खूप मोठे आहे. पाटीदार समाजाला काँग्रेससोबत घेण्याचा हा व्युहात्मक भाग आहे. (विशेष प्रतिनिधी)