शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

Election Results Live - पंजाब आणि गोव्यात आपच्या अपेक्षा धुळीस

By admin | Updated: March 11, 2017 13:48 IST

आज जाहीर झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला जबरदस्त

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 -  आज जाहीर झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला जबरदस्त धक्का बसला आहे.  पंजाबमध्ये बहुमत आणि गोव्यात चांगल्या जागा मिळतील, या अपेक्षेवर असलेल्या आपच्या पदरी निकालांमधून निराशा पडली आहे. 
पंजाबमध्ये काँग्रेसने अकाली दल आणि भाजपा आघाडीला सत्तेतून बाहेरची वाट दाखवताना काँग्रेसने एकहाती बहुमताच्या दिशेने कूच केली आहे. तर जोरदार प्रचार यंत्रणा राबवून पंजाबचे राजकीय वारे आपच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या  आम आदमी पक्षाला केवळ 21 जागांवर आघाडी मिळवता आली आहे. 
गोव्यामध्येही आपच्या पदरी निराशा पडली आहे.  गोव्यात आपला खातेही उघडता आलेले नाही. त्यामुळे दिल्लीत बंपर विजय मिळवल्यानंतर देशातील अन्य राज्यात विस्तार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आम आदमी पक्षाला धक्का बसला आहे.