शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाचा नवा फंडा, मतदानासाठी करा वेळेची नोंदणी

By admin | Updated: June 12, 2015 13:13 IST

मतदान केंद्राबाहेर मतदारांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागण्याचे दिवस आता इतिहासजमा होण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १२ - मतदान केंद्राबाहेर मतदारांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागण्याचे दिवस आता इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. मतदाराचा वेळ वाचवण्यासाठी निवडणूक आयोगाने आता नवनवीन योजना राबवण्याचा विचार सुरु केला असून याअंतर्गत मतदारांना मतदानासाठी वेळेची आगाऊ नोंदणी करणे शक्य होण्याची चिन्हे आहेत.
निवडणुकीत मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र नेहमीच दिसते. यामुळे मतदारांचा वेळही वाया जातो व रांगेत उभे राहावे लागेल या भीतीपोटी अनेक मतदार मतदानाकडे पाठ फिरवतात. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घेतला आहे. मतदान केंद्रावर येण्यापूर्वी मतदारांना त्यांना कोणत्या वेळेत मतदान करणे शक्य आहे याची माहिती देता येईल.  मतदानाच्या दिवशी सकाळी ८ ते दुपारी ३  या वेळेत ही सुविधा उपलब्ध असेल अशी माहिती सूत्रांनी दिली. या योजनेवर लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती एका वरिष्ठ निवडणूक अधिका-याने इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे. 
मतदानासाठी वेळेची आगाऊ नोंदणी करण्यासोबत मतदान केंद्रावर टोकन सुविधाही सुरु केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये मतदान केंद्रावर गेल्यावर मतदाराला टोकन दिले जाईल व टोकन क्रमांक आल्यावर त्याला मतदानाचा हक्क बजावता येईल. यामुळे रांगेचे व्यवस्थापन करणे शक्य होईल असे अधिका-यांचे म्हणणे आहे. स्थलांतरित कामगारांनाही मतदानाचा हक्क बजवता यावा यासाठी निवडणूक आयोगाने एका समितीची स्थापना केली आहे.