शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या १४ लाख ईव्हीएम खरेदी करण्याची निवडणूक आयोगाची इच्छा

By admin | Updated: December 7, 2015 01:40 IST

किमान नऊ लाखांपेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) वापराची १५ वर्षांची कालमर्यादा लवकरच समाप्त होणार असल्याने आता

नवी दिल्ली : किमान नऊ लाखांपेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) वापराची १५ वर्षांची कालमर्यादा लवकरच समाप्त होणार असल्याने आता ५,५११.४८ कोटी रुपये खर्चाच्या किमान १४ लाख नव्या ईव्हीएम खरेदी करण्याची निवडणूक आयोगाची इच्छा आहे.विधि मंत्रालयाने नव्या ईव्हीएम खरेदी करण्यासाठी ‘तत्त्वत: मंजुरी’ दिलेली आहे. सध्या वापरात असलेल्या ९,३०,४३० इव्हीएम २०१५-१६ ते २०१९-२० या काळात ‘अनुपयोगी’ ठरतील. त्यामुळे २०१५-१६, २०१६-१७, २०१७-१८ आणि २०१८-१९ या वित्त वर्षात अंदाजे ५,५११.४८ कोटी रुपये किमतीची १३ लाख ९५ हजार ६४८ नवी मतदान यंत्रे (बॅलटिंग युनिट) आणि ९ लाख ३० हजार ४३२ नियंत्रण यंत्रे (कंट्रोल युनिट) खरेदी करण्याचा प्रस्ताव आयोगाने विधि मंत्रालयाकडे पाठविला आहे.एका ईव्हीएममध्ये एक नियंत्रण यंत्र आणि एक मतदान यंत्र पाच मीटर लांबीच्या केबलशी जोडलेले असते. नियंत्रण यंत्र प्रमुख अधिकाऱ्याजवळ असते, तर मतदान यंत्र मतदान कक्षात असते, जेथे मतदार आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या समोर असलेले बटन दाबून मतदान करतो. (वृत्तसंस्था)‘आम्हाला प्रस्ताव प्राप्त झालेला आहे आणि या प्रस्तावाला विधि मंत्रालयाने तत्त्वत: मंजुरीही दिली आहे. आता वित्त मंत्रालयातील सचिवांच्या (व्यय) अध्यक्षतेत बिगर योजना खर्चासंबंधातील समिती या प्रस्तावाला मंजुरी देईल. त्यानंतर विधिमंत्रालय त्याला अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव कॅबिनेटकडे घेऊन जाईल, असे विधि मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.