शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाची शशिकलांना टोपी, तर पनीरसेल्वमना मिळाला विजेचा खांब

By admin | Updated: March 23, 2017 14:50 IST

गेल्या काही दिवसांपूर्वी जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूमधील सत्ता संघर्ष उफाळून आला

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 23 - गेल्या काही दिवसांपूर्वी जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूमधील सत्ता संघर्ष उफाळून आला होता. मात्र त्यावेळी पनीरसेल्वम यांच्यावर शशिकलांनी मात केल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. जयललितांच्या निधनामुळे तामिळनाडूमधील आर. के. नगरमधल्या जागेवर 12 एप्रिलला पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. त्या निमित्तानं पुन्हा एकदा अण्णाद्रमुकमधले शशिकला आणि पनीरसेल्वम गट आमने-सामने आले होते. दोन्ही गटांनी अण्णाद्रमुकच्या चिन्हावर दावा केला होता. त्यावेळी निवडणूक आयोगानं ते चिन्हच गोठवलं होतं. आता निवडणूक आयोगानं शशिकलांच्या गटाला टोपी(hat), तर पनीरसेल्वम यांच्या गटाला विजेचा खांब (electricity pole) ही चिन्हांचं वाटप केलं आहे. तसेच निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना वेगवेगळे नाव देण्यास मंजुरी दिली आहे. शशिकलांच्या गटाला ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र अम्मा(एआईएडीएमके अम्मा) तर पनीरसेल्वम यांच्या गटाला एआईएडीएमके पुराट्ची थलैवी अम्मा हे नाव बहाल करण्यात आलं आहे. दोन्ही गटांनी अण्णाद्रमुकच्या निवडणूक चिन्हावर दावा केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगानं ते चिन्हच गोठवलं होतं. शशिकलांच्या गटानं निवडणूक आयोगाकडे स्वतःच्या पक्षाचं एआईएडीएमके अम्मा या नावासाठी आग्रह धरला होता. शशिकलांच्या गटानं निवडणूक आयोगाकडे निवडणूक चिन्हासाठी तीन पर्यायही ठेवले होते. त्यात ऑटो रिक्षा, बॅट आणि हॅट यांचा समावेश होता. शशिकला गटाला निवडणूक आयागोनं रिक्षा हे चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नंतर त्यांच्या आग्रहाखातर त्यांना टोपी(hat) हे चिन्ह देण्यात आलं आहे.