शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

सुदृढ लोकशाहीचे गमक राज्यघटनेत एकनाथराव खडसे : सामाजिक न्याय विभागातर्फे पत्रकारांसाठी कार्यशाळा

By admin | Updated: March 5, 2016 23:49 IST

जळगाव : सर्व नागरिकांना समान मताधिकार आणि त्याद्वारे प्रस्थापित होणारे लोकशाहीचे राज्य हे भारताचे वैशिष्ट्य आहे. गेल्या ६५ वर्षात आपल्या देशात लोकशाही केवळ टिकली नाही तर ती सुदृढ झाली. याचे गमक हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या भारतीय राज्य घटनेत आहे, असे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले.

जळगाव : सर्व नागरिकांना समान मताधिकार आणि त्याद्वारे प्रस्थापित होणारे लोकशाहीचे राज्य हे भारताचे वैशिष्ट्य आहे. गेल्या ६५ वर्षात आपल्या देशात लोकशाही केवळ टिकली नाही तर ती सुदृढ झाली. याचे गमक हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या भारतीय राज्य घटनेत आहे, असे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले.
सामाजिक न्याय विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त शनिवारी पत्रकारांसाठी एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनात आयोजित या कार्यशाळेसाठी एकनाथराव खडसे यांच्यासमवेत जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ, उपजिल्हाधिकारी साजिदखान पठाण, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल पवार, सामाजिक न्याय विभागाचे साहाय्यक आयुक्त राकेश पाटील,जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी प्राची वाजे आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला महात्मा ज्योतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून दीपप्रज्ज्वालन करण्यात आले.

बुद्धिमत्ता, परिश्रम, कतृर्त्वाच्या जोरावर क्रांती...
उपस्थित पत्रकारांना आणि पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना संबोधित करतांना खडसे म्हणाले की, आपली बुद्धिमत्ता, कठोर परिश्रम आणि कतृर्त्वाच्या जोरावर डॉ. आंबेडकर यांनी या देशात सामाजिक क्रांती घडवली. समाजातील दलित, मागासलेल्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी तत्कालिन व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले आणि न्याय मिळवून दिला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या देशाला एका सूत्रात बांधणारी राज्यघटना दिली.

जगभरातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना...
आजही भारताची राज्यघटना जगभरातील सर्वोत्कृष्ट घटना मानली जाते. प्रत्येक नागरिकाच्या मताला समान अधिकार या घटनेने दिला आहे. या अधिकाराद्वारे लोक येथे आपले राज्यकर्ते कोण, हे ठरवू शकतात. राज्याच्या प्रत्येक निर्णयात जनतेचा सहभाग असतो, ही सगळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेची किमया आहे, असे खडसे म्हणाले.

शासनाचे अनेक उपक्रम...
देशाला अहिंसा आणि शांतीचा विचार देण्यासाठी त्यांनी बुद्ध धर्माचा अंगीकार केला. विघटनवादी शक्तींना दूर ठेवण्यासाठी बाबासाहेबांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे हे वैश्विक स्वरुप लोकांपुढे आणण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, असेही खडसे यांनी सांगितले.