शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यू झाल्याचे भासवून आठ वर्षाच्या मुलीने बलात्का-याच्या तावडीतून केली सुटका

By admin | Updated: June 1, 2016 19:53 IST

पिडित मुलगी दिल्लीच्या किरारी भागामध्ये रहाते. शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास आरोपीने पिडित तरुणी तिच्या घराबाहेर कॉटवर झोपलेली असताना तिचे अपहरण केले.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ०१ - एका आठ वर्षाच्या मुलीने स्वत:चा मृत्यू झाल्याचे भासवून बलात्का-याच्या तावडीतून सुटका करुन घेतल्याची घटना दिल्लीमध्ये घडली. पिडित मुलगी दिल्लीच्या किरारी भागामध्ये रहाते. शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास आरोपीने पिडित बालिका घराबाहेर कॉटवर झोपलेली असताना तिचे अपहरण केले. 
 
मात्र जाग आल्यानंतर आपण अनोळखी ठिकाणी असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला पण आरोपीने तिचे तोंड दाबले. आरोपीने पिडित अल्पवयीन मुलीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपी आपल्याला ठार मारेल अशी त्या मुलीला भिती वाटत होती. म्हणून ती काहीही हालचाल न करता निपचित पडून राहिली जेणेकरुन आरोपीला मृत्यू झाला आहे असे वाटावे. 
 
मुलीचा मृत्यू झाला असे समजून आरोपी तिथून निघताच पिडित मुलगी उठली व घराच्या दिशेने पळू लागली. हा प्रकार आरोपीच्या लक्षात येताच त्याने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. या मुलीने घरी पोहोचून घडला प्रकार आई-वडीलांना सांगितला. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली. पिडित मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिला आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. आरोपीला मंगळवारी अटक करण्यात आली.