शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिकांचा पदके जाळण्याचा प्रयत्न

By admin | Updated: November 12, 2015 00:10 IST

केंद्र सरकारने घोषित केलेल्या ‘वन रँक, वन पेन्शन’ योजनेला विरोध करीत आज माजी सैनिकांनी पदके जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या वादाला आज नवीनच वळण मिळाले.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने घोषित केलेल्या ‘वन रँक, वन पेन्शन’ योजनेला विरोध करीत आज माजी सैनिकांनी पदके जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या वादाला आज नवीनच वळण मिळाले.सरकारविरोधी घोषणा देत या माजी सैनिकांनी कॅमेऱ्यासमोर आपली पदके जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पदके जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या या माजी सैनिकांना मेजर जनरल (निवृत्त) सतबीरसिंह यांच्यासह अन्य सैनिकांनी रोखले आणि पदके जाळू दिली नाहीत.हे माजी सैनिक पदके जाळणार नाहीत, असे सांगण्यात आले होते. तथापि, ते पदके जाळणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना मिळाली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी तेथे पोहोचले होते. त्यानंतर जवळपास ५० माजी सैनिकांनी राष्ट्रपती भवनाच्या दिशेने मार्च काढला; पण दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखून धरले. हरियाणा आणि पंजाबातील काही माजी सैनिकांनी मंगळवारी पदके वापस केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्लीत पदके जाळण्याचा प्रयत्न झाला. या घटनेवर संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी दु:ख व्यक्त केले.दरम्यान, आंदोलनकारी माजी सैनिकांना शांत करण्याचे प्रयत्न आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सैनिकांसोबत दिवाळी साजरी करताना ते म्हणाले की, ओआरओपीशी निगडित सर्व मुद्दे न्यायालयीन समिताच्या समोर उपस्थित करून त्यावर विचार केला जाऊ शकतो.(लोकमत न्यूज नेटवर्क)