शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
4
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
5
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
6
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
7
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
8
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
9
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
10
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
11
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
12
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
13
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
14
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
16
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
17
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
18
सचिन तेंडुलकरची मॉडिफाय लॅम्बोर्गिनी उरुस एस कार पाहून मुंबईकर चकीत!
19
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
20
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!

गरीबांच्या शिक्षणहक्काच्या जागा अबाधितच !

By admin | Updated: August 14, 2015 23:35 IST

हायकोर्ट : शाळांच्या याचिका फेटाळल्या

हायकोर्ट : शाळांच्या याचिका फेटाळल्या
मुंबई : मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी २५ टक्के जागा पूर्व प्राथमिक व पहिलीच्या प्रवेशात राखून ठेवा, या राज्य शासनाच्या परिपत्रकाविरोधात काही शाळांनी दाखल केलेल्या याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावल्या.
न्या. अनुप मोहता यांच्या खंडपीठाने या याचिका फेटाळल्या. तसेच ज्या शाळा जागा राखून ठेवणार नाहीत त्यांच्यावर शासनाने योग्य ती कारवाई करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
शासनाने जानेवारी महिन्यात हे परिपत्रक जारी केले. त्यानंतर एप्रिल महिन्यात नव्याने परिपत्रक जारी करून शाळांना या जागा राखीव ठेवण्याचे आदेश शासनाने दिले. ज्या शाळा पूर्व प्राथमिक वर्गापासून प्रवेश देतात त्यांनी तसेच ज्या शाळा पहिलीपासून प्रवेश देतात त्यांनी या प्रवेशापासून जागा राखून ठेवाव्यात. शिवाय, पूर्व प्राथमिक प्रवेशात काही जागा शिल्लक राहिल्यास पहिलीच्या प्रवेशात हा कोटा वर्ग करावा, असेही शासनाने शाळांना सांगितले होते. मात्र यंदाचे प्रवेश पूर्ण झाल्याने यंदाच्या वर्षी अशा पद्धतीने प्रवेश देणे शक्य नसल्याचा दावा करत डझनभर शाळांनी न्यायालयात धाव घेतली होती.
मात्र काही शाळा या राखीव जागा विकतात, असे प्रतिज्ञापत्र शासनाने न्यायालयात दाखल केले. तर शाळांनी शासनाचे परिपत्रक बेकायदा असल्याचा दावा केला. अखेर उभयंतांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने याचा निकाल राखून ठेवला होता व तो शुक्रवारी जाहीर केला. (प्रतिनिधी)